ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंका दौऱ्यात टी२० मालिका जिंकल्यावर चांगली सुरूवात केली होती. मात्र वनडे मालिकेत त्यांची कामगिरी खूपच निराशाजनक ठरली आहे. टी२० मालिका जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिका जिंकण्याचा हेतू यजमान संघाने धूळीत मिळवला आहे. पहिला वनडे सामना गमावल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला सलग तीन वनडे सामन्यात पराभूत केले आहे. यामुळे श्रीलंका पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-१ने पुढे आहे. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे झालेल्या सामन्यात डेविड वॉर्नर (David Warner) याने ९९ धावा करून सुद्धा पाहुण्या संघाला ४ धावांनी सामना गमवावा लागला.
या विजयाबरोबरच श्रीलंका संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर १९९२ नंतर प्रथमच वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत श्रीलंकेने तिन्ही सामने जिंकत ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. या मालिकेत अरविंदा डी सिल्वाने सर्वाधिक २०७ धावा केल्या होत्या.
चौथ्या वनडेच्या अंतिम षटकामध्ये ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी २५ धावांची गरज होती, मात्र संघ ५० षटकातच २५४ वर सर्वबाद झाला. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा वनडे सामना २४ जूनला कोलंबो येथे खेळला जाणार आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. याेवळी श्रीलंकेच्या चरिथ असलंकाने शतकी खेळी करत संघाला २५८ धावसंख्या उभारण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. त्याने १०६ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११० धावा करत पहिले वनडे शतक झळकावले. त्याच्या व्यतिरिक्त धनंजया डी सिल्वाने ६१ चेंडूत ६० धावा आणि वानिंदू हसरंगाने तीन चौकार मारत २० चेंडूत २१ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने तीन धावसंख्या असतानाच पहिली विकेट गमावली. सलामीवर वॉर्नरने बाकी फलंदाजासोबत उत्तम कामगिरी करत धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची खेेळी ९९ धावावर संपुष्टात आली. त्याने ११२ चेंडूत १२ चौकार मारले. पॅट कमिंसने या सामन्यात दोन विकेट घेत ३५ धावाही जोडल्या. ट्रेविस हेडने २७ आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मिशेल मार्शने २६ धावा केल्या. मार्शने गोलंदाजीही सुरेख करताना दोन विकेट्स घेतल्या होत्या.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी विजयी लय कायम ठेवत विशेष गोलंदाजी केली. चमिका करुणारत्ने, डी सिल्वा आणि जेफ्री वॅन्डर्से यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. ४९व्या षटकात करूणारत्नेने सहा धावा देत एक विकेट घेतली होती. हा क्षण महत्वाचा ठरला. हसरंगानेही एक विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ENGvsIND: रोहितच्या उपस्थितीत विराटच निभावतोय कर्णधाराची भुमिका, नेमके कारण काय?