आशिया चषक 2023मधील सुपऱ फोर फेरीतील दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. एकंदरीत स्पर्धेतील हा सामना आठवा सामना असून बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सदीरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिस यांच्या अर्धशतकांच्या जोरवार श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 257 धावा कुटल्या.
बांगलादेशला जिंकण्यासाठी 50 षटकांमध्ये 258 धावांचे लक्ष्य मिळाले आहेत. तस्किन अहमद आणि हसन महमूद यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेत श्रीलंकन संघाला निर्धारित धावसंख्येवर रोखले. श्रीलंकेसाठी सदीरा समरविक्रमा याने सर्वाधिक 93 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यासाठी त्याने 72 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस याने 73 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त सलामीवीर पथून निसांका याने 60 चेंडूत 40 धावा कुटल्या होत्या. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शरफूल इस्लाम याला 2 विकेट्स मिळाल्या.
Sri Lanka sets a target of 258! Sadeera's brilliant 93 and Kusal's 50 have set the stage. Now, it's over to our bowlers to shine!#AsiaCup2023 #SLvBAN #LankanLions pic.twitter.com/mYFm3GqsBE
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 9, 2023
सुपर-4मधील दुसऱ्या सामन्यासाठी उभय संघ-
बांगलादेश- मोहम्मद नईम, मेहिदी हसन मिराज, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम, हसन महमूद, नसुम अहमद
श्रीलंका- पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, महीश थीक्षणा, कसुन राजिथा, मथीशा पथिराना (Bangladesh have won the toss and have opted to field Asia Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
‘आम्ही फायद्यात आहोत…’, भारताविरुद्ध खेळण्याआधी दिसला बाबर आझमचा कॉन्फिडेंस
IND vs PAK सामन्याआधी श्रीलंकन खेळाडूंना विराटकडून मिळाली प्रेरणा! व्हिडिओ व्हायरल