---Advertisement---

श्रीलंकेचा घाम काढत दिप्तीने रचला इतिहास, अष्टपैलूंचा ‘हा’ विक्रम नावे करणारी बनली पहिली भारतीय महिला

On: गुरूवार, जून 23, 2022 5:31 PM
---Advertisement---

भारतीय महिला संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन टी२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळल्या जाणार आहेत. यातील पहिला टी२० सामना गुरूवारी (२३ जून) दंबूला येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने यजमान संघाचा ३४ धावांनी पराभव केला आहे. भारताने या विजयाबरोबर दौऱ्याची चांगली सुरूवात केली आहे. यावेळी दीप्ती शर्माने ८ चेंडू खेेळत तीन चौकार मारले. या सामन्यात तिने २१०च्या स्ट्राईक रेटने १७ धावा केल्या. याबरोबरच एक विक्रमही तिने आपल्या नावे केला आहे.

अष्टपैलू दीप्तीने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये आधीच ५० विकेट्सचा टप्पा पार केला आहे. या सामन्यात तिने झटपट फलंदाजी करत ५०० धावांचा टप्पाही गाठला आहे. यामुळे ती आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५०० पेक्षा अधिक धावा आणि ५० पेक्षा अधिक विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) टी२०मध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ती तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंंकत प्रथम फलंदाजी केेली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरचा हा निर्णय चुकला असल्याचे लक्षात आले. भारताचे जेमिमाह रोड्रीगुज आणि शेफाली वर्मा या दोघी वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यांनी अनुक्रमे नाबाद ३६ आणि ३१ धावा केल्या आहेत. तर सलामीवर आणि स्टार फलंदाज स्म्रिती मंधाना एक धावावरच बाद झाली. भारताने २० षटकात ६ विकेट्स गमावत १३८ धावा केल्या आहेत.

श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात दीप्तीने ३ षटके टाकताना ९ धावा देत १ विकेट घेतली आहे. तिच्या व्यतिरिक्त शेफाली आणि पुजा वस्त्राकार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. राधा यादवने ४ षटकात २२ धावा देत २ विकेट्स घेतल्या आहेत.

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी२० सामना २५ जूनला रनगिरी दंबूला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दंबूला येथे खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

लिसेस्टरशायरकडून टीम इंडियाचे जंगी स्वागत, सराव सामन्यापूर्वी असे काही करत जिंकली भारतीयांची मने

‘द्रविडसोबत वेळ घालवणे विराटला फायद्याचे ठरेल’, कोहलीच्या प्रशिक्षकांनी सांगितले कारण

आयर्लंडविरुद्ध खेळणारा तिसरा कर्णधार असेल हार्दिक पंड्या, मागील दौऱ्यात अशी राहिलीय कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---