---Advertisement---

यशस्वी जैस्वालच्या ‘IPL आश्वासनाला’ श्रीलंकेच्या फलंदाजाने म्हटले ‘थॅंक्यू’, लगेच गमावली विकेट! व्हिडिओ पाहाच

On: बुधवार, ऑगस्ट 19, 2026 4:55 PM
---Advertisement---

गॉल येथे श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे बुधवारी (19 ऑगस्ट) यशस्वी जैस्वाल आणि निरोशन डिकवेला यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 372 धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना 60 व्या षटकात डिकवेला आणि जैस्वाल यांच्यात ही शाब्दिक चकमक झाली. यामध्ये भारतीय फलंदाजाने श्रीलंकन विकेटकीपर-फलंदाजाला गोलंदाजीवर हल्ला करण्याचे आव्हान दिले.

स्क्वेअर लेग’ला उभा असलेल्या जैस्वालसोबतचा डिकवेलाचा संवाद:
जैस्वाल – अरे यार, पहिल्या डावात तू खूप शॉट्स मारले होतेस. आताही तसं काहीतरी हवंय, चल ना.
डिकवेला – हो?
जैस्वाल – हो, मला बघायचंय. चल, तिकडे शॉट मार (डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बोट दाखवत). का नाही मारणार?
डिकवेला – गरज नाहीये. मला IPL मध्ये घे, मग मी शॉट्स मारेन.
जैस्वाल – घेऊ, 100% घेऊ. चल, त्याला एक षटकार मार, मी तुला IPL मध्ये घेईन.
डिकवेला – थॅंक्यू.

हा संवाद पुढे ठेवण्यासाठी वेळ बाकी नव्हता, कारण त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डिकवेलाने आपली विकेट गमावली. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या त्या चेंडूवर डिकवेलाने ऑफ साइडला शॉट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या कडला लागला आणि विकेटकीपर ऋषभ पंतने तो उत्तमरित्या झेलला. डिकवेला 10 धावा करत बाद झाला.

डिकवेलाच्या विकेटनंतर यजमान संघाची स्थिती आणखीनच वाईट झाली. लंच ब्रेकपर्यंत श्रीलंकने 175 धावसंख्येवर 6 विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारताला जिंकण्यासाठी चार विकेट्सची आवश्यकता होती, ज्या मानव सुथारने घेतल्या आणि भारताने हा सामना 165 धावांनी जिंकला.

या मालिकेतील पुढील सामना 23 ऑगस्टला असून तो कोलंबोला खेळला जाणार आहे. ही मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2025-2027 (WTC) चा भाग आहे. (SL vs IND Galle Test Niroshan Dickwella thanked Yashasvi Jaiswal for his ‘IPL promise’ but immediately lost his wicket; video.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---