---Advertisement---

मोठी बातमी! कोलंबो कसोटी वाद प्रकरणात ICC ऍक्शन मोडमध्ये, जैस्वाल-फर्नांडो यांच्यावर केली कडक कारवाई

On: सोमवार, ऑगस्ट 24, 2026 2:57 PM
---Advertisement---

कोलंबोमध्ये सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी घडलेल्या घटनेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऍक्शन घेतली आहे. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्या दोघांवर ICC ने कडक कारवाई केली आहे.

या घटनेत आयसीसीला खेळाडू आणि खेळाशी संबधित कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आचारसंहितेच्या कलम 2.12 चे उल्लंघन झाल्याने आढळून आले. हे कलम ‘आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, खेळाडूंचे सहाय्यक कर्मचारी, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसोबत (प्रेक्षकासह) अयोग्य शारीरिक संपर्क साधण्याशी’ संबंधित आहे.

वरील कलमाचे उल्लंघन केल्याने ICC ने जैस्वाल आणि फर्नांडो यांना त्यांच्यावर सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे. तसेच दोघांना प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.

मागील 24 महिन्यांच्या कालावधीत दोन्ही खेळाडूंवर कोणताही गुन्हा दाखल नव्हता.

नेमके काय घडले?
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना भारताच्या डावाच्या 17 व्या षटकावेळी घडली. यशस्वी आणि असिथा यांच्यातील वाद इतका वाढला की त्यांना रोकण्यासाठी बाकी खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला. हा वाद का झाला, यामागचे कारण जाणून घेऊ.

सामन्यातील 17 वे षटक वेगवान गोलंदाज असिथाने टाकले. त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारतीय सलामीवीर क्लीनबोल्ड झाला. यशस्वी 53 चेंडूत 9 चौकारांच्या सहाय्याने 45 धावा करत विकेट गमावून बसला. बाद झाल्यावर यशस्वी शांतपणे पॅव्हेलियनकडे निघाला होता. तेवढ्यात श्रीलंकेच्या गोलंदाजाने त्याला काहीतरी म्हटले आणि तो मागे वळून असिथाच्या दिशेने गेला.

दोघांमधील वाद इतका वाढला की ते एकमेकांना डोक्याने धडक देऊ लागले. श्रीलंकेच्या बाकी खेळाडूंनी हस्तक्षेप करत दोघांमधील वाद थांबवला. बाद होण्याआधी यशस्वीने असिथाला लागोपाठ तीन चौकार मारले होते, मात्र बॅटफूटवर एक शॉट खेळण्याचा प्रयत्नात तो बाद झाला आणि त्याचे अर्धशतक हुकले.

दोन्ही खेळाडूंनी ICC ची शिक्षा मान्य केली असून औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

दुसरा कसोटी सामन्याचा रोमांच वाढला असून दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबला आहे. ध्रुव जुरेल 95 धावा करत क्रीजवर आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज 17 चेंडू खेळून 0 धावावर उपस्थित आहे. भारताची पहिल्या डावात सध्या स्थिती 475/8 अशी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---