नवा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेने नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. या मालिकेद्वारे गंभीरसमोर पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर वनडे संघासाठी मधल्या फळीची बांधणी हा महत्त्वाचा घटक असेल. गेल्या वर्षीच्या वनडे विश्वचषकात जेव्हा रिषभ पंत एका गंभीर कार अपघातात झालेल्या दुखापतीतून सावरत होता, तेव्हा केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी मधल्या फळीत भारताचा गड राखला होता. पण 20 महिन्यांनंतर पंतचे भारताच्या वनडे संघात पुनरागमन झाल्याने तीन खेळाडूंमध्ये मधल्या फळीतील दोन स्थानांसाठी चुरस पाहायला मिळेल. याबाबत भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी आपले मत मांडले आहे.
‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वरील एका कार्यक्रमात बोलताना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर म्हणाले, “मला खात्री नाही की शिवम दुबे आणि रियान पराग वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतील की नाही, कारण विराट आणि रोहित पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे पहिल्या तीन क्रमांकावर नजर टाकली तर ते रोहित, शुभमन आणि विराट असतील, हे अगदी स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत, माझ्या मते रिषभ, श्रेयस आणि केएल राहुलपैकी फक्त दोनच खेळू शकतात. त्यामुळे यष्टीरक्षकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली जाईल.”
“गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेतील श्रेयस आणि राहुलची कामगिरी जरी चमकदार असली, तरीही डाव्या हाताचा फलंदाज रिषभ पंत भारताला अव्वल सहामध्ये असणे गरजेचे आहे. त्यामुळे माझ्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंत हा एक स्वयंचलित पर्याय असेल आणि केएल व श्रेयसला मधल्या फळीतील दुसऱ्या जागेसाठी संघर्ष करावा लागेल,” असेही पुढे श्रीधर म्हणाले.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या नव्या जर्सीतील वाढले ‘स्टार’, फोटो पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान!
IPL Auction 2025; बीसीसीआय आणि आयपीएल मालकांची होणार बैठक
या 2 स्टार्सपैकी कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान? श्रीलंकेमालिकेपूर्वी हेड कोच गंभीरसमोर मोठे आव्हान