एकीकडे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा चाहते आनंद लुटत आहेत, तर दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही विक्रमांचे मनोरे रचले जात आहेत. आयर्लंड संघ श्रीलंका दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात आली. या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना शुक्रवारी (दि. 28 एप्रिल) गाले मैदानावर पार पडला. हा सामना श्रीलंकेने 1 डाव आणि 10 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी कमालीचा खेळ दाखवला. फलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेने हा सामना जिंकला. सामन्यात श्रीलंकेच्या एका स्टार खेळाडूने इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, त्याने श्रीलंकेसाठी सर्वात वेगवान 50 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. चला तर सविस्तर जाणून घेऊयात…
‘या’ खेळाडूने रचला इतिहास
श्रीलंकेचा 31 वर्षीय फिरकीपटू प्रभात जयसूर्या (Prabath Jayasuriya) याने आयर्लंडविरुद्ध कमालीची गोलंदाजी केली. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने पहिल्या डावात 5 विकेट्स नावावर केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 2 विकेट्सही चटकावल्या. अशाप्रकारे त्याने सामन्यात एकूण 7 विकेट्सची कमाई केली. यासोबतच तो श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 50 विकेट्स (Prabath Jayasuriya 50 Wickets) घेणारा खेळाडू बनला. त्याने आपल्या सातव्या सामन्यातच ही कामगिरी करून दाखवली.
A record-breaking wicket for Prabath Jayasuriya 🔥
Read more ➡️ https://t.co/GjYbogNQNo#SLvIRE pic.twitter.com/UGuCbR9JHQ
— ICC (@ICC) April 28, 2023
Prabath Jayasuriya storms into the record books as the quickest 🏎️💨 Spinner and the quickest Sri Lankan to reach 50 Test wickets,🔥 joining the ranks of the second-fastest players in Test cricket history! 🏏🎉
Jayasuriya hit the 50-wicket mark in just his seventh Test to snatch… pic.twitter.com/Jq6Ia2mZV0
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) April 28, 2023
प्रभात जयसूर्या हा कसोटीत सर्वात वेगवान 50 विकेट्स घेणारा फिरकीपटूही आहे. त्याने अल्फ व्हॅलेंटाईनचा विक्रम मोडीत काढला. व्हॅलेंटाईनने वेस्ट इंडिजच्या सन 1951-52 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 8 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या. आता फिरकीपटू प्रभातने 71 वर्षांनंतर त्याचा हा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच, एकूण गोलंदाजी यादीबद्दल बोलायचं झालं, तर कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 50 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चार्ली टर्नर अव्वलस्थानी आहे. त्याने सहाव्या सामन्यात हा पराक्रम गाजवला होता.
C H A M P I O N S!
Sri Lanka clinch the #SLvIRE Test series 2-0! #LionsRoar pic.twitter.com/ZzjbZPWlYD
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) April 28, 2023
कसोटीत सर्वात वेगवान 50 विकेट्स घेणारे गोलंदाज
चार्ली टर्नर- 6 सामने
प्रभात जयसूर्या – 7 सामने*
वर्नोन फिलेंडर – 7 सामने
टॉम रिचर्डसन – 7 सामने
टेरी एल्डरमॅन – 8 सामने
अल्फ व्हॅलेंटाईन- 8 सामने
घरगुती क्रिकेटमध्येही केली कमाल
प्रभात जयसूर्या याने श्रीलंका संघाकडून 7 कसोटी सामन्यात 50 विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त त्याने श्रीलंका संघासाठी 2 वनडे सामनेही खेळले आहेत. त्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 83 सामन्यात 355 विकेट्स घेतल्या आहेत. घरगुती क्रिकेटमधील या शानदार प्रदर्शनानंतरच त्याला श्रीलंका संघात स्थान मिळवण्यात यश आले होते. (sl vs ire cricketer prabath jayasuriya become fastest spinner to takes 50 wickets in test cricket breaks 71 year old record)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘धोनीविरुद्ध खेळून मला कोणताही दबाव जाणवत नाही, उलट…’, RRच्या मॅचविनर पठ्ठ्याचे मोठे विधान
‘संजूने अनुभवी कर्णधारावर…’, राजस्थानच्या विजयानंतर भारतीय दिग्गजाच्या विधानाने खळबळ; वाचाच