कुसल परेराचे शतक आणि श्रीलंकेच्या विजयाने 2025 वर्षाची सुरुवात झाली आहे. या वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नेल्सन येथील सॅक्सटन ओव्हल येथे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कुसल परेराच्या शतकाच्या जोरावर पाहुण्या संघ श्रीलंकेने 7 धावांनी विजय मिळवला. मात्र, यजमानांनी (न्यूझीलंड) तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर 219 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर किवी संघ निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 211 धावाच करू शकला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने 49 धावा केल्या पण दोन विकेटही गमावल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कुसल परेराने 46 चेंडूत 13 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 101 धावांची खेळी करत संघाला 218 धावांपर्यंत नेले. त्याच्याशिवाय कर्णधार चारिथ असलंकाने 24 चेंडूत 46 धावांची तुफानी खेळी केली.
कुसल परेरा महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान यांच्यानंतर श्रीलंकेसाठी टी-20 मध्ये शतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. 14 वर्षांनंतर श्रीलंकेच्या खेळाडूने T20I मध्ये शतक झळकावले आहे.
KUSHAL PARERA SCORED FIRST HUNDRED IN INT’L CRICKET IN 2025…!!!!
He smashed 101 runs from 46 balls including 13 fours and 4 Sixes against New Zealand in 3rd T20I Match – What a Knock by Kushal Parera. pic.twitter.com/Gd6ND261x9
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 2, 2025
टी20 मध्ये श्रीलंकेचे शतक
100- महेला जयवर्धने, 2010
104*- तिलकरत्ने दिलशान, 2011
101- कुसल परेरा, 2025
या धावसंख्येचा पाठलाग करताना किवीसंघाकडून सलामीवीर रचिन रवींद्रने 39 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या आणि सहकारी फलंदाज टिम रॉबिन्सन (37) सोबत पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. परंतु असे असतानाही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
डॅरेल मिशेल मधल्या फळीत आला आणि त्याने 17 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या, पण तो शेवटपर्यंत टिकू शकला नाही. श्रीलंकेकडून चारिथ असलंकाने सर्वाधिक ३ बळी घेतले. कुसल परेराला त्याच्या झंझावाती शतकासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा-
भारतीय संघाचे 2025 मधील टी20 सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक, पाहा एका क्लिकवर
IND vs AUS: भारत मालिका गमावणार! सिडनीमध्ये टीम इंडियाची आश्चर्यकारक आकडेवारी
IND vs AUS: सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का, स्टार गोलंदाज जखमी