---Advertisement---

पहिल्या दिवशीच पाकिस्तान विरुद्ध फर्नांडो, चंडीमलचा ड्रीम फॉर्म कायम; पाकिस्तान संकटात

On: रविवार, जुलै 24, 2022 8:13 PM
Dinesh Chandimal & Angelo Mathews
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (SLvsPAK) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज (रविवार, २४ जुलै) पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान संघाने  तीनशेचा आकडा पार केला आहे. त्यांनी ६ विकेट्स गमावत ३१५ धावा केल्या आहेत. तर खेळपट्टीवर निरोशन डिकवेला ४२ आणि दुनिथ वेल्लालागे ६ धावा करत उपस्थित आहेत.

श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने (Dimnuth Karunaratne) याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने सलामीला येत ओशाडा फर्नांडोसोबत पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. या जोडीला मोहम्मद नवाजने तोडले. फर्नांडो ५० धावा करत बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कुशल मेंडिसला आगा सलमानने ३ धावांवर असताना धावबाद केले. १०० धावा होण्याच्या आतच २ विकेट्स गेल्याने यजमान संघ चिंतेत आला होता. मात्र पुढे श्रीलंकन फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला आहे.

कसोटी कारकिर्दीतील १००वा सामना खेळणाऱ्या अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४२ धावा केल्या. त्याने आणि लयीत असणाऱ्या दिनेश चंडीमल (Dinesh Chandimal) यांनी अनुभवाचा फायदा घेत ७५ धावांची भागीदारी केली. चंडीमलने मॅथ्यूज बाद झाल्यावर धनंजय डी सिल्वाच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ६३ धावा केल्या. चंडीमलने पुन्हा एकदा धमाकेदार खेळी केली आहे. तो ८० धावा करत बाद झाला.

मागील सामन्यात ५ विकेट्स घेणाऱ्या नवाजने या सामन्यातही महत्वाच्या २ विकेट्स घेतल्या. त्याने फर्नांडोनंतर चंडीमललाही बाद करत श्रीलंकेच्या धावांचा वेग काहीसा कमी केला. मात्र नंतर डी सिल्वा आणि यष्टीरक्षक डिकवेला यांनी ३२ धावांची भागीदारी रचली. डी सिल्वाने ३३ धावा जोडल्या. तर डिकवेला ९७.६७च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. त्याने ४३ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार मारले आहेत.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे या कसोटीला मुकला आहे. संघाला त्याची उणीव नक्कीच जाणवत असेल. त्याने मागील सामन्याच्या पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या अनुपस्थितीत नसीम शाह आणि नौमान अली यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेत संघाची गोलंदाजी सांभाळली आहेत. यासिर शाहनेही १ विकेट घेतली.

या सामन्यातून वेल्लालागे याने कसोटी पदार्पण केले आहे. त्याला मॅथ्यूजकडुन कसोटी कॅप मिळाली. पहिल्या दिवशी यजमान संघाने ३.६६च्या रनरेटने धावा केल्या असल्या तरी दुसऱ्या दिवशी कोणाचे पारडे ठरणार जड हे पाहण्यासारखे आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आता कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी शास्त्री गुरूजींनी दिला‌ सल्ला; म्हणाले, “हे करा तरच…”

विराटच्या बालपणीच्या कोचचे धवनबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘त्याला पुढच्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत…’

विराट नाही तर सूर्यकुमार ठरतोयं ‘या’ खेळाडूसाठी धोकादायक, भारताच्या दिग्गजाचे आश्चर्यकारक विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---