श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. श्रीलंका संघाने मालिकेत दमदार पुनरागमन करत २४६ धावांनी दुसरा व अखेरचा वनडे सामना जिंकला आहे. यासह मालिका १-१ ने बरोबरीत सुटली आहे. या सामन्यातील अखेरच्या डावात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने चिवट झुंज दिली. परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याला श्रीलंकेच्या फिरकीपटू प्रबध जयसूर्या याने बाद केले.
पाकिस्तानच्या दुसऱ्या व सामन्यातील (Second ODI) अखेरच्या डावात आझमने ८१ धावा केल्या. १४६ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. परंतु शतकाच्या नजीक असताना ३० वर्षीय फिरकी गोलंदाज प्रबध जयसूर्याने (Prabath Jayasuriya) त्याला पायचित केले. यापूर्वी पहिल्या डावातही आझम प्रबध जयसूर्याच्या गोलंदाजीचाच शिकार ठरला होता. जयसूर्याने त्याला पहिल्या डावात १६ धावांवर त्रिफळाचीत केले होते.
जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या आझमने (Babar Azam)मागील ७ कसोटी डावांपैकी ६ डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. परंतु तो प्रबध जयसूर्याविरुद्ध टिकून राहण्याचा उपाय अद्याप शोधू शकलेला नाही. प्रबध जयसूर्याने आझमविरुद्ध ४ डावांमध्ये गोलंदाजी करताना त्यापैकी ३ डावांमध्ये त्याची विकेट घेतली आहे.
प्रबध जयसूर्याने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत फक्त ३ सामने खेळले आहेत. या ३ सामन्यांमध्येच त्याचे आकडे खूप प्रशंसनीय आहेत. त्याने २० च्या सरासरीने २९ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ५९ धावांवर ६ विकेट्स हे त्याचे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन राहिले आहे. तसेच यादरम्यान त्याने ४ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
दुसरीकडे आझमने ४२ कसोटी सामने खेळताना ४७.३ च्या सरासरीने ३१२२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ७ शतकांचा समावेश आहे. तसेच २३ अर्धशतकांचाही समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
त्रिनिदादमध्ये भारताचे जास्त सामने घेतल्याने संतापला कॅरेबियन दिग्गज; म्हणाला, “काय गरज होती ?”
विंडीजला क्लिन स्वीप दिल्यानंतर कॅप्टन धवनचे अनोखे सेलेब्रेशन झाले व्हायरल