वनडे विश्वचषक 2023 श्रीलंकन संघासाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नाप्रमाणे ठरला. पहिल्या आठ पैकी फक्त दोन सामने श्रीलंकन संघाला जिंकता आले. सोमवारी (6 नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकन संघ तीन विकेट्सने पराभूत झाला. सोबतच श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची बॉडी बरखास्त केली गेली. माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा एसएलसीचे प्रभारी अध्यक्ष बनले असून संघात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतील.
अर्जुन रणतुंगा () श्रीलंकन संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि कर्णधार राहिले आहेत. क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी येत्या काळात संघात बदल घडवण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. रणतुंगा यांनी 1996 साली श्रीलंकन संघाला विश्वचषक मिळवून दिला होता. एकेकाळी जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघांमध्ये गणल्या जाणाऱ्या श्रीलंकन संघाची सध्या बिकट परिस्थिती आहे. मागच्या काही वर्षांपासून श्रीलंकन संघ सुमार क्रिकेट खेळताना दिसला आहे. याच पार्श्वभूमीवर एसएलसीचे प्रभारी अध्यक्ष अर्जुन रणतुंगा यांनी रणनीती आखली आहे.
विश्वचषकातील सुमार प्रदर्शानंतर रणतुंगा यांच्या मते श्रीलंकन संघात शिस्त कमी पडत आहे. ते स्वतः खेळत असताना ज्या पद्धतीचा तगडा संघ श्रीलंकेकडे होता, तसा संग पुन्हा बाधण्यासाठी येत्या काळात ते प्रयत्न करणार आहेत. रणतुंगा म्हणाला, “मला संघात शिस्त आणायची आहे आणि खेळाडूंना शिखरावर पोहोचण्यासाठी सक्षम बनवायचे आहे. हे कोणा एका खेळाडूविषयी नाहीये. मी मजबूत संघ बनवण्याबाबत बोलत आहे. मी खेळताना होता अगदी अगदी तसाच संघ बनवायचा आहे. मी चाहत्यांची झालेली निराशा पाहिली आहे. क्रिकेटला एका नव्या युगात घेऊन जाणे, ही माझी जबाबदारी आहे.”
दरम्यान, श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांच्या निर्णयामुळे क्रिकेट बोर्डाच्या सर्व सदस्यांना पदावरून हटवण्यात आले, असे सांगितले जात आहे. रणसिंघे यांनीच श्रीलंका क्रिकेट बोर्डासाठी सात सदस्यांची प्रभारी समिती नियुक्त केली आहे. याचे अध्यक्षपद रणतुंगा यांच्याकडे सोपण्यात आले आहे. रणसिंघे यांच्या मते ही समिती आगामी वर्षांमध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा तपास करेल. (SLC’s new president Arjun Ranatunga will discipline the players of the Sri Lankan team that failed in the World Cup.)
महत्वाच्या बातम्या –
वानखेडेवर अफगाणी कर्णधाराने जिंकला टॉस, करणार पहिली बॅटिंग; कमिन्ससेनेतून 2 हुकमी एक्के बाहेर
खिलाडूवृत्ती न दाखवणाऱ्या शाकिबने यापूर्वीही केलाय राडा! अंपायरपुढेच स्टम्पला मारली होती लाथ- Video