विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. 5 वेळच्या चॅम्पियनसोबत अफगाणिस्तान मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भिडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात अफगाणिस्तान संघात एक बदल आहे. फजलहक फारूकी बाहेर पडला असून त्याच्या जागी नवीन उल हकला संघात जागा मिळाली आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया संघातही दोन बदल आहेत. स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरून ग्रीन संघाबाहेर झाले असून त्यांच्या जागी ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांची एन्ट्री झाली आहे.
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील उभय संघांची कामगिरी पाहिली, तर ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. त्यातील पहिले 2 सामने गमावले, तर पुढील सलग पाचही सामने नावावर केले. यानंतर 10 गुणांसह ऑस्ट्रेलिया पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. अशात हा सामना जिंकत ऑस्ट्रेलिया पॉईंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे, हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना 4 सामने जिंकण्यात यश आले आहे, तर 3 सामन्यांवर त्यांना पाणी फेरावे लागले आहे. या चार विजयांनंतर त्यांचे 8 गुण असून पॉईंट्स टेबलमध्ये त्यांचा सहावा क्रमांक आहे. अशात, हा सामना जिंकत अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न करेल. (Afghanistan have won the toss and have opted to bat against Australia)
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 39व्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, ऍडम झम्पा
अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक
हेही वाचा-
ब्रेकिंग! विश्वचषक 2023 चालू असतानाच श्रीलंका क्रिकेट बोर्ड सस्पेंड, ‘या’ कारणामुळे उचलले मोठे पाऊल
खिलाडूवृत्ती न दाखवणाऱ्या शाकिबने यापूर्वीही केलाय राडा! अंपायरपुढेच स्टम्पला मारली होती लाथ- Video