प्रो कबड्डीमध्ये प्रत्येक संघाचे नाव त्यांच्या भोगौलिक स्थितीवरून ठेवले आहे. विशिष्ट भाषा, विशिष्ट शहर तर कधी प्रांत यांच्यानुसार कबड्डी संघाना नावे देण्यात आली आहेत. या प्रत्येक संघांचे विशिष्ट असे पाठीराखे आहेत. या पाठीराख्यात जोश आणि एकसंघ भावना उदयास यावी म्हणून प्रत्येक संघांची ब्रीद वाक्य ठरलेली आहेत.
जेव्हा कधी कबड्डीचा संघ सामन्यात मागे असतो. त्यांना संघासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देण्याचे काम ही स्फुर्तीदायक ब्रीदवाक्य करत असतात. अश्या स्फुर्तीने खेळाडू त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त चांगली कामगीरी करून दाखवतात. अशी कित्येक उदाहरणे आपण जाणतो.
आपण पाहू प्रो कबड्डीमधील संघ आणि त्यांची ब्रीदवाक्य-
१ पुणेरी पलटण – #घेऊन टाक
२ दबंग दिल्ली – #दिलसे दबंग
३ जयपूर पिंक पँथर्स -#रोअर फॉर पँथर्स
४ गुजरात फॉरचूनजायन्टस -#गरजेगा गुजरात
५ तमील थालयइवाज- #नम्मा मन्नु नम्मा गेम
६ हरयाणा स्टीलर्स- #लाथ गाड दो
७ बेंगाल वॉरियर्स- #अमार वॉरियर्स
८ यु.पी.योद्धा – #योद्धा हम
९ तेलुगू टायटन्स- #वी आर टिटॅनियम
१० पटणा पायरेट्स -#पायरेट्स हमला
११ बंगलूरु बुल्स- #फुल चार्ज माडी
१२ यु मुंबा -# ममबॉयज