---Advertisement---

टी20 वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात स्लो फिफ्टी! ओमानच्या नदीमने रचला इतिहास, सूर्यकुमारही लिस्टमध्ये

On: गुरूवार, फेब्रुवारी 12, 2026 4:52 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा पहिला सामना (गुरूवार, १२ फेब्रुवारी) श्रीलंका विरुद्ध ओमान यांच्यात खेळला गेला. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंका १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात ओमान २२६ धावसंख्येचा पाठलाग करत होता. तेव्हा मोहम्मद नदीमने संघर्षपूर्ण अर्धशतकी खेळी आणि इतिहास रचला.

नदीमने ५६ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या.यामध्ये त्याने ३ चौकार आणि एक षटकार मारला. त्याबरोबरच त्याने टी२० विश्वचषकातील श्रीलंकेच्या दिग्गजाचा विक्रम मागे टाकला.

नदीम या सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याचे सध्या वय ४३ वर्ष १६१ दिवस आहे. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने वय ३९ वर्ष ३४५ दिवस असताना वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती.

याबरोबरच नदीमने एक निराशाजनक विक्रमही आपल्या नावे केला आहे. तो टी२० विश्वचषकात सर्वात संथ गतीने अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू बनला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध ५२ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या स्थानावर आहे. कॅनडाविरुद्ध त्यानेही ५२ चेंडूत अर्धशतक केले होते. या यादीत तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेविड मिलर आहे. नेदरलॅंड्स विरुद्ध त्याची धावा करण्याची गती कमी झाली. त्याने २०२४च्या त्या सामन्यात ५० चेंडूत अर्धशतक केले होते.

या यादीत भारताचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमारही आहे. त्याने २०२४मध्येच यूएसएविरुद्ध ४९ चेंडूत अर्धशतक केले होते. सामना जिंकण्यासाठी त्याची ही खेळी महत्वाची होती.

टी२० विश्वचषकात सर्वात संथ अर्धशतक (चेंडूनुसार)
५२ – मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) विरुद्ध कॅनडा, न्यू यॉर्क, २०२४
५२ – मोहम्मद नदीम (ओमान) विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, २०२६*
५० – डेविड मिलर (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध नेदरलॅंड्स, न्यू यॉर्क, २०२४
४९ – डेवॉन स्मिथ (वेस्ट इंडिज) विरुद्ध बांग्लादेश, जोहान्सबर्ग, २००७
४९ – डेविड हसी (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, २०१०
४९ – सूर्यकुमार यादव (भारत) विरुद्ध यूएसए, न्यू यॉर्क, २०२४

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---