जुलै १८, रोजी कोलंबो येथे श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात बहुप्रतिक्षित पहिला वनडे सामना पार पडला. शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी करत ७ विकेट्सने यजमानांना धूळ चारली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार लौकिकास साजेशी खेळी करू शकला नाही. परंतु क्षेत्ररक्षणात त्याने आपले सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान लाईव्ह सामन्यात समालोचकांनी भुवनेश्वरच्या वयाबद्दल विधान केले होते. यावरुन भारतीय यष्टीरक्षक फलंदाज श्रीवत्स गोस्वामी याने त्या समालोचकाला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.
त्याचे झाले असे की, २५ व्या षटकादरम्यान ३१ वर्षीय भुवनेश्वर लाँग ऑफवर क्षेत्ररक्षणासाठी उभारला होता. यावेळी २५ व्या षटकातील कृणाल पंड्याच्या चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज धनंजय डी सिल्वा याने लाँग ऑफच्या दिशेने एक फटका मारला. तिथेच क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या भुवनेश्वरने डाव्या बाजूला डाईव्ह सिल्वाचा अप्रतिम झेल टिपला. यावेळी समालोचन करत असलेला भारतीय समालोचक मुरली कार्तिक याने भुवनेश्वरच्या वयावर अप्रत्यक्षपणे विधान केले.
सहसा लाँग ऑन किंवा लाँग ऑफवर युवा क्रिकेटपटू क्षेत्ररक्षण करताना दिसतात, असे कार्तिक म्हणाला. अर्थात त्याने अप्रत्यक्षपणे भुवनेश्वरला वयस्कर म्हटले आणि असे वयस्कर खेळाडू लाँग ऑफवर क्षेत्ररक्षणासाठी असू नयेत, असे मत व्यक्त केले. त्याच्या या विधानावरुन विवाद निर्माण झाला आहे.
गोस्वामीने कार्तिकला प्रत्युत्तर देत कोणत्याही समालोचकाला खेळाडूला त्याच्या वयावरुन निशाण्यावर घेणे, अर्थात त्याचा अपमान करणे होय, असे म्हटले आहे. (SlvIND: Shreevats Goswami slams Indian commentator for indirectly calling Bhuvneshwar Kumar ‘old’)
https://twitter.com/shreevats1/status/1416723879402295297?s=20
ट्वीट करत गोस्वामीने लिहिले की, ‘नुकतेच समालोचकाने लाँग ऑन किंवा लाँग ऑफला सहसा युवा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसतात असे म्हटले आहे. यावेळीच नेमका भुवीने लाँग ऑफला झेल घेतला होता. कोणाच्याही वयावरुन तुम्ही त्याला युवा किंवा वयस्कर असे संबोधू शकत नाही. खरे तर खेळाडूंना त्यांच्या वयावरुन बोलण्याची गरजच काय असते?’
महत्त्वाचे म्हणजे, गोस्वामी आणि भुवनेश्वर हे आयपीएलमधील भिडू आहेत. ते आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतात.
महत्त्वाच्या बातम्या-
सुरेश रैनाच्या काकांची हत्या करणारा आरोपी अखेर ताब्यात, ११ महिन्यांपासून सुरू होता शोध
दोन वर्षांपुर्वी चहलने एका वनडेत घेतल्या होत्या ६ विकेट्स, आज पुन्हा ही कामगिरी करत बनणार ‘शतकवीर’!






