---Advertisement---

कसं काय बरं? असंही आऊट होतं का कुणी? श्रीलंकेच्या खेळाडूला विवादास्पद निर्णय देत ठरवले बाद; पाहा व्हिडिओ

---Advertisement---

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने विजय मिळवला आहे. परंतु याच सामन्यात, श्रीलंकन संघाचा फलंदाज दनुष्का गुणातिलका फलंदाजी करत असताना पंचांनी विवादास्पद निर्णय घेत बाद घोषित केले. त्यामुळे सोशल मीडियावर पंचांच्या निर्णयाबाबत विरोध केला जात आहे.

श्रीलंकन संघाचा फलंदाज गुणातिलका अर्धशतकिय खेळी करून आक्रमक फलंदाजी करत असताना वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड २२ वे षटक फेकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. तर झाले असे की, पोलार्डने डाव्या हाताचा फलंदाज गुणातिलका याला सरळ चेंडू टाकला. त्या चेंडूवर गुणातिलकाने रक्षात्मक शॉट खेळत एक धाव घेण्याचा प्रयत्न केला.

तो चेंडू पकडण्यासाठी पोलार्ड धावला आणि तो चेंडू गुणातिलकाच्या पायाला लागला.  त्यामुळे पोलार्डला तो चेंडू पकडता आला नाही. नंतर पंचांकडे वेस्ट इंडिज संघाने अपील केले. त्यावेळी पंचांनी ऑब्स्ट्रकटिंग द फील्डच्या (क्षेत्ररक्षणात बाधा आणल्यामुळे) नियमानुसार त्याला बाद घोषित केले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या निर्णयावर गुणातिलका आणि क्रिकेट चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये पाहिल्यास स्पष्ट दिसून येत आहे की, त्याने मुद्दाम चेंडूला लाथ मारली नाही.

https://twitter.com/CloudyCric/status/1369695372147187714?s=20

पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG: टीम इंडिया जरा जपूनच, ‘हे’ इंग्लिश खेळाडू एकहाती पलटू शकतात सामना 

टीम इंडियाचा धाक! टी२० मालिकेपुर्वी इंग्लंडच्या कॅप्टनचे मोठे भाष्य, म्हणाला, “भारताला भारतात पराभूत…”

T20 Series: हे आहेत ३ गोलंदाज, जे दुखापतग्रस्त टी नटराजनची घेऊ शकतात जागा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---