India vs Afghanistan 3rd T20I: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्मा याने तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात 121 धावांची जबरदस्त खेळी केली. पण हा सामना रोहित शर्माच्या विक्रमी पाचव्या शतकापेक्षा दोन सुपर ओव्हरमुळे रोमांचित झाला. हा खराब अंपायरिंग, खेळाडूंमधील वाद आणि नियमांचे उल्लंघन यामुळे लक्षात राहील. रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्यातील 190 धावांच्या विक्रमी भागीदारीमुळे भारताने 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने गुलबदिन नायबच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 212 धावा करत सामना बरोबरीत आणला. प्रकरण सुपर ओव्हरपर्यंत पोहोचले. पहिल्या सुपर ओव्हरमध्येही निकाल लागला नाही, तेव्हा दुसरी सुपर ओव्हर झाली, ज्यामध्ये भारताचा विजय झाला. सामना आणि मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी दिसत होता.
सामनावीर म्हणून निवड झालेला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, ‘हे शेवटचे कधी झाले ते मला आठवत नाही. मला वाटते की, मी आयपीएलच्या एका सामन्यात तीन वेळा फलंदाजी केली आहे. यावेळी भागीदारीकरणे महत्त्वाचे होते. रिंकू आणि मी सतत याबद्दल बोलत होतो. 22 धावांत चार विकेट्स गमावल्यानंतर प्रचंड दडपण होते आणि आमच्यासाठी बराच वेळ क्रीजवर राहणे महत्त्वाचे होते.
रोहित शर्माने रिंकू सिंगचे मनापासून कौतुक केले. भारतीय कर्णधार म्हणाला की, भारतीय संघाला संघाला रिंकूसारख्या खेळाडूची गरज आहे. रिंकू डावाचा शेवट अविश्वसनीय करतो. त्याने सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताला संकटातून बाहेर काढण्यात खूप वेळा मदत केली आहे. या सामन्यातही त्याने 39 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या. रोहितच्या मते, ‘गेल्या काही मालिकांमध्ये त्याने दाखवून दिले की, तो बॅटने काय करू शकतो. तो खूप शांत आहे आणि त्याला त्याची ताकद चांगली माहीत आहे.” (Small pack big bang Rohit credits this player for victory against Afghanistan)
हेही वाचा
IND vs AFG: ‘आता स्पर्धेत कोणीच नाही…’ रोहितने कर्णधारपदाचा रोवला झेंडा, कॅप्टन कूलचा विक्रम काढला मोडीत
IND vs AFG: ‘आम्ही पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करू’ अफगाणिस्तानविरूद्ध मालिका जिंकल्यानंतर रोहितचं वक्तव्य