---Advertisement---

विराट सचिनपेक्षाही भारी, स्मिथ तर विराटच्या आसपासही नाही

On: रविवार, मे 17, 2020 10:31 AM
---Advertisement---

विराटकडे इतरांशी तुलना करताना जे काही वेगळे गुण आहेत, त्यामुळे तो सचिनपेक्षा पढे असल्याचे मत इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने व्यक्त केले आहेत.

“विराटने धावांचा पाठलाग करताना दबाच्या परिस्थितीत भारताला मिळवुन दिलेले विजय, तो खेळत असताना त्यावर असलेला दबाव यामुळे स्मिथच्या त्याच्या आसपासही नाही,” असे पीटरसन फेसबुक लाईव्ह दरम्यान झिंबाब्वेचा माजी क्रिकेटपटू पोमी एम्बॅंग्वाला म्हणाला.

सचिन व विराटमधील एकाची निवड करायला सांगितल्यावर पीटरसन म्हणाला, मी विराटला निवडेल कारण त्याचे धावांचे पाठलाग करताना दिसणारे आकडे. त्याचे हे आकडे जबरदस्त आहेत. धावांचा पाठलाग करताना त्याची सरासरी ८० आहे. त्याची जवळपास बरीच शतकं धावांचा पाठलाग करतानाची आहे.

वनडेत धावांचा पाठलाग करताना विराटने १३८ सामन्यात ६८.३३च्या सरासरीने ७०३९ धावा केल्या आहेत तर सचिनने २३६ सामन्यात ४२.३३च्या सरासरीने ८७२० धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---