भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपल्या गोलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात १ फलंदाजांना त्याने बाद केले. अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन स्टीव स्मिथला देखील फसवले होते. आता स्मिथनेही अश्विनचे कौतुक केले आहे.
स्मिथ पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ १ धाव करून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथला अश्विनबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, ‘अश्विन हा जागतिक दर्जाचा फिरकीपटू असून निश्चितच त्याच्याविरुद्ध खेळताना मी अधिक सावधानतेने खेळेल.’
पत्रकारांशी बोलताना स्मिथ म्हणाला की ‘मी ज्या चेंडूवर बाद झालो, तो उत्तम चेंडू होता. मी तो चेंडू स्पिन होणार या आशेवर खेळलो मात्र तो स्पिन न होता सरळ राहिला व त्यामुळे मी बाद झालो. बाद होणाऱ्या चेंडू पूर्वीचे दोन्ही चेंडू स्पिन झाले होते, त्यामुळे मी तो चेंडू खेळताना फसलो. क्रिकेटमध्ये अनेक वेळा अशा बाबी तुमच्या सोबत घडत असतात. निश्चितच मी पुढील सामन्यात उत्तम फलंदाजी करेल.’
पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात फिरकीपटू आर आश्विनच्या गोलंदाजीवर स्मिथ स्लीपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्य राहणेकडे झेल देत बाद झाला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 53 धावांची आघाडी देखील मिळवली होती, मात्र तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातात भारतीय संघाचा दुसरा डाव 9 बाद 36 धावांवर संपुष्टात आला (११व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद शमी रिटायर्ट हर्ट झाला होता). प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ दोन गडी गमावत माफक ९० धावसंख्येचे लक्ष्य सहज २१ षटकात पूर्ण केले.
भारताचा हा पराभव निश्चितच सर्व क्रिकेट रसिकांना विसरणे अवघड जात आहे. आता हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशाप्रकारे मैदानात पुनरागमन करतो.
पालकत्व रजा घेऊन विराट कोहली भारतात परतल्याने मालिकेतील उर्वरित सर्व सामान्यांसाठी अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंद गगनात मावेना! क्रिकेट पाहताना चिमुकल्यांचा उत्साह कॅमेऱ्यात कैद, फोटो तुफान व्हायरल
मोठी बातमी! भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीसाठी असा असणार ऑस्ट्रेलियाचा ११ जणांचा संघ
व्हिडिओ : राशिद खानच्या केवळ ४ चेंडूवर ‘या’ गोलंदाजाने फटकाविल्या तब्बल १५ धावा