पर्थ । ॲशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने चांगली कामगिरी करताना ३९९ चेंडूत २३९ धावा केल्या. परंतु यावर्षी कसोटीत विराटने केलेल्या २४३ धावांचा विक्रम मोडण्यात त्याला अपयश आले.
विराटने मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेल्या दिल्ली कसोटीत २४३ धावांची खेळी केली होती. यावर्षी एका कसोटी डावात सर्वोच्च धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो कूकसह अव्वल स्थानी होता.
आज स्मिथला जेम्स अँडरसनने पायचीत बाद केले तेव्हा तो २३९ धावांवर खेळत होता. या सामन्यात स्मिथला त्रिशतक करण्याची मोठी संधी होती.
यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये केलेलय सर्वोच्च धावा
२४३- विराट कोहली । अलिस्टर कूक
२३९- स्टीवन स्मिथ
२१७- शाकिब उल हसन
२१३- विराट कोहली
२०४- विराट कोहली
२०२- चेतेश्वर पुजारा