---Advertisement---

पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेतून या दिग्गजांना वगळले; ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

---Advertisement---

मंगळवारी(८ ऑक्टोबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मायदेशात श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी १४ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ घोषित केला आहे.

या ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघात स्टिव्ह स्मिथने जवळ जवळ ३ वर्षांनी पुनरागमन केले आहे. त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना भारताविरुद्ध मार्च २०१६ मध्ये खेळला आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाच्या या टी२० संघात डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र वरच्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजाला संधी मिळालेली नाही.

त्याचबरोबर मार्कस स्टॉयनिस, शॉन मार्श, डॉर्सी शॉर्ट, झाय रिचर्डसन, पिटर हँड्सकॉम्ब, नॅथन कुल्टर-नाईल आणि नॅथन लायन या खेळाडूंनाही ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघात संधी मिळालेली नाही.

हे सर्व फेब्रुवारीमध्ये भारताविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होते. मात्र यातील एकालाही श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळाले नाही.

मोठ्या खेळाडूंना वगळण्यात आले असले तरी मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेले बिली स्टॅनलेक, बेन मॅकडेरमोट आणि केन रिचर्डसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघात पुनरागमन केले आहे.

ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्ध २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान ३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात ३ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. तसेच त्यानंनतर २ कसोटी सामने होतील

मायदेशात होणाऱ्या श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ –

ऍरॉन फिंच(कर्णधार), ऍश्टन एगार, ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडेरमॉट, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, बिली स्टॅनलेक, मिशेल स्टार्क, ऍश्टन टर्नर, अँड्र्यू टाय, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.

https://twitter.com/cricketcomau/status/1181397371885768704

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment