द हंड्रेड महिला 2023 च्या 17 व्या सामन्यात सदर्न ब्रेव्ह महिलांनी वेल्स फायर महिला संघाचा 2 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेल्स फायरने 100 चेंडूत 5 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ब्रेव्ह महिला संघाने शेवटच्या चेंडूवर आठ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. जॉर्जिया ऍडम्सला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी (2 विकेट आणि 40 धावा) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
नाणेफेक गमवल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या वेल्स फायरची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार टॅमी ब्युमॉंट अवघ्या 10 धावा करून बाद झाली. मात्र, यानंतर सोफिया डंकली आणि सारा ब्राइस यांनी 73 धावांची भागीदारी केली. सोफिया डंकलीने 33 चेंडूत 50 धावा केल्या तर सारा ब्राइस 36 चेंडूत 44 धावा करून नाबाद राहिली. शेवटी लॉरा हॅरिसने 8 चेंडूत 19 धावा करत संघाला 144 धावांपर्यंत नेले. सदर्न ब्रेव्हजसाठी जॉर्जियाने 2 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना सदर्न ब्रेव्हजची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 1 धावांवर संघाला पहिला धक्का बसला. सलामीवीर डॅनियल व्याट खाते न उघडता बाद झाली. यानंतर स्मृती मंधाना आणि मैया बुशीर यांनी 77 धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. मंधानाने 30 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 41 धावा केल्या. त्याचवेळी, बुशीरने 26 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी केली. जॉर्जियाने 24 चेंडूत 40 धावा केल्या. शेवटच्या 5 चेंडूंवर संघाला विजयासाठी 9 धावा हव्या होत्या. मागील सामन्यात हॅट्ट्रिक घेणाऱ्या शबनम इस्माईलला यावेळी या धावांचा बचाव करता आला नाही.
(Smriti Mandhana And Georgia Shines In Southern Braves Win In The Hundred)
महत्वाच्या बातम्या –
शफाली वर्मासह विमानतळावर गैरवर्तन! ट्विटरवर सांगितली आपबिती, वाचा संपूर्ण प्रकरण
यष्टीरक्षक सॅमनससह कुलदीपने दाखवली चपळाई, टीम इंडियासाठी घेतले दोन जबरदस्त कॅच