भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यात विक्रमी कामगिरी केली आहे. भारतीय संघाने पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात तीन दिवस फलंदाजी केली. भारतीय कर्णधार मिताली राजने अखेर ३७७ धावांवर भारताचा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारतीय फलंदाज स्मृती मंधानाने या सामन्यात विक्रमी शतक झळकावले.
कॅरारा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय महिला फलंदाजांनी चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी १४५ षटके गोलंदाजी करूनही ते भारतीय संघाला सर्वबाद करू शकले नाही. भारताने शनिवारी ८ विकेटवर ३७७ धावा करत आपला डाव घोषित केला. याआधी भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम धावसंख्या ही ३४३ धावांची होती, जी त्यांनी १९८४ मध्ये अहमदाबादमध्ये केली होती.
भारतीय संघाच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्व श्रेय स्मृती मानधनाला जाते. या २५ वर्षीय फलंदाजाने १२७ धावांची मौल्यवान खेळी खेळली. ऑस्ट्रेलियन भूमीवर परदेशी महिला फलंदाजाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या मॉली हाइडच्या नावावर होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी शतक झळकावणारी स्मृती मंधाना ही दुसरी भारतीय महिला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये संध्या अगरवालने ही कामगिरी केली होती. त्यावेळी संध्याने मुंबईत १८४ धावांची खेळी खेळली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही प्रकारात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मृती मंधानाने जागा मिळवली आहे. ती या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. एनिड ब्लॅकवेल, डेबी हॉकले आणि क्लेयर टेलर यांनी याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारात शतक झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हिटमॅन’ची ताकदच बनतेय चिंतेचा विषय, आवेश खानने असे पकडले रोहितला जाळ्यात, पाहा व्हिडिओ
यशस्वी जयस्वालचे तुफानी फलंदाजी! १९ चेंडूत अर्धशतक करत ‘त्या’ खास यादीत मिळवले दुसरे स्थान