भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रिती मंधाना हिने नवीन गाडी खरेदी केली आहे. रेंज रोवर इव्होक ही एसयूव्ही गाडी स्म्रितीच्या ताफ्यात सहभागी झाली आहे. भारतीय संघासाठी अनेक सामन्यांममध्ये ‘मॅच विनर’ ठरलेली स्म्रिती नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. असात तिने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतलेल्या या नवीन गाडीची देखील चांगलीच चर्चा होत आहे.
स्म्रिती मंधाना (Smriti Mandhana) हिने स्वतः या नवीन गाडीचे फोटो शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये स्म्रिती तिच्या नवीन कोऱ्या रेंज रोवर इव्होक (Range Rover Evoque) सोबत उभी असल्याचे दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार स्म्रितीने रेंज रोवर इव्होक गाडीचे टॉप मॅडेल खरेदी केले आहे. माहितीनुसार या एसयूव्ही गाडीच्या बेस मॅडेलची किंमत 72 लाख रुपये आहे. स्म्रितीच्या या गाडीचा रंग सिलिकॉन सिल्वर आहे.
या गाडीत अनेक गोष्टी खास आहेत. गाडीत थ्री डी साउंड कॅमेरा आहे. केबिन एअर आयोनायजेशनसोबत पीएम 2.5 फिल्टर देखील आहे. सेफ्टीचा विचार केला, तर ऑटोमॅटिक एंटिलॉक ब्रेकिंग सिस्टम, साउट एडबॅक, फ्रंट एअरबॅग आणि ओवरहेट एअरबॅग देखील आहेत. रेंज रोबर इव्होक 2.0 लीटरच्या पेट्रोल इंजनसह येते. यामध्ये 247 बीएचपीपेक्षा अधिक ताकतीसह 365 एनएमपेक्षा अधिक टॉर्क जनरेट होते.
स्म्रिती मंधानाची क्रिकेट कारकीर्द –
स्म्रिती मंधाना भारतीय महिला संघाची महत्वपूर्ण फलंदाज आहे. तिने भारतासाठी अनेक सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली आहे आणि सामने जिंकवले देखील आहेत. तिच्या एकंदरीत कारकिर्दीचा विचार केला, तर ती अप्रतिम राहिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्म्रितीने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत आणि यामध्ये 325 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने 77 सामने खेळले असून 3073 धावांची खेळी केली. टी-20 क्रिकेटमध्ये तिने 102 सामने खेळले असून 2337 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंतला मिळाली पाहिजे प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी, ‘ही’ आहेत तीन प्रमुख कारणे
‘ते काय लई भारी आहेत का? पुढच्या आठवड्यात जातील बाहेर’, भारताविरुद्ध पाकिस्तानच्या दिग्गजाने ओकली गरळ