सध्या महिला टी२० चॅलेंजचं वारं सुरू आहे. या स्पर्धेतील तिसरा साखळी सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध वेलोसिटी असा झाला. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्म्रीती मंधाना हिने महिला टी२० चॅलेंजच्या तिसऱ्या सामन्यात शानदार क्षेत्ररक्षण करताना एक आश्चर्यकारक झेल पकडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या सामन्यात जरी मंधानाला तिच्या फलंदाजीची कला दाखवता आली नाही, पण तिने आपल्या क्षेत्ररक्षणाने चाहत्यांची मनं नक्कीच जिंकली.
स्म्रीती मंधाना ही एक उत्तम फलंदाज असण्यासोबतच एक चांगली क्षेत्ररक्षक आहे. हे तिने अनेकदा सिद्ध करून दाखवले आहे. असेच एक दृश्य महिलांच्या टी२० चॅलेंजच्या तिसऱ्या सामन्यात दिसले जेव्हा तिने दीप्ती शर्माचा एक आश्चर्यकारक झेल पकडला. हा झेल पाहिल्यानंतर सगळेच थक्क झाले. कारण दीप्ती शर्माने मिडविकेटवर ज्या वेगाने हा शॉट खेळला, तो पकडणे तितके सोपे नव्हते.
कर्णधार दीप्ती शर्मा क्रिजवर फलंदाजी करत असताना वेलोसिटीच्या डावात हा झेल पाहायला मिळाला. राजेश्वरी गायकवाडच्या चेंडूवर दीप्ती शर्माने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, फटका मारण्यास दिप्ती असफल ठरली आणि चेंडू थेट स्म्रीती मंधानाच्या हातात गेला. जोरात लगावलेल्या या फटक्याचा झेल घेणे अवघड काम होते. मात्र, स्म्रीतीने ते सोपे करून दाखवले.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, महिला टी२० चॅलेंजचा तिसरा सामना वेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ट्रेलब्लेझर्सने प्रथम फलंदाजी करताना वेलोसिटीसमोर विजयासाठी १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, वेलोसिटीला निर्धारित २० षटकांत केवळ १७४ धावा करता आल्या आणि ट्रेलब्लेझर्सने हा सामना १६ धावांनी जिंकला. ट्रेलब्लेझर्स संघाने सामना जिंकला असेल. पण, या विजयानंतरही हा संघ अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजस्थानला धूळ चारत प्लेऑफच्या बड्या विक्रमात बेंगलोर चेन्नईची करणार का बरोबरी? पाहा काय आहे रेकॉर्ड
शतकी खेळीआधी रजत पाटीदारला संघात नव्हते जास्त महत्त्व? आरसीबीचा तो Video व्हायरल
पराभवानंतर काय विचार करतोय KL Rahul, सोशल मीडियावर शेअर केली आश्चर्यचकित करणारी पोस्ट