---Advertisement---

स्म्रीती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी! व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण, मोडला दिग्गज ऑस्ट्रेलियनचा रेकॉर्ड!

On: रविवार, एप्रिल 27, 2025 6:26 PM
Smriti-Mandhana-T20I-Record
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेत आहे, जिथे त्यांना यजमान संघ तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिरंगी मालिका खेळायची आहे. ही मालिका आज (27 एप्रिल) पासून सुरू झाली आहे. दरम्यान पहिला सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) चांगली सुरुवात केली. तिने 46 चेंडूत 6 चौकारांसह 43 धावा केल्या. या खेळीदरम्यान मानधनाने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये 8,000 धावा पूर्ण केल्या.

अशी कामगिरी करणारी सहावी महिला फलंदाज ठरली. याशिवाय, तिने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंगलाही मागे टाकले आणि पाचव्या स्थानावर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी मानधनाला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये 8,000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 30 धावांची आवश्यकता होती आणि तिने हे धावा सहजपणे पूर्ण केल्या. आता तिच्याकडे वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 8,013 धावा आहेत. यासह, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मानधना पाचव्या स्थानावर आहे. तिने ऑस्ट्रेलियाची अनुभवी मेग लॅनिंगला मागे टाकले आहे. लॅनिंगच्या नावावर 8,007 धावा आहेत.

भारताची डावखुरी सलामीवीर स्म्रीती मानधनाने 2013 मध्ये बांगलादेशविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय आणि वनडे सामन्यात पदार्पण केले. अल्पावधीतच, ती भारतीय संघाची एक महत्त्वाची फलंदाज बनली. आज तिची गणना मॅचविनर्समध्ये होते. मानधनाने तिच्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत 98 सामने खेळले आहेत. या काळात तिने 46.21च्या सरासरीने 4,253 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 10 शतके आणि 30 अर्धशतके आहेत. त्याच वेळी, टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, मानधनाने 148 सामन्यांमध्ये 29.38च्या सरासरीने 3,761 धावा केल्या आहेत. या दरम्यान, तिने 30 अर्धशतके झळकावली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---