---Advertisement---

वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये स्म्रीती मंधनाचा शतकी धमाका! ‘असा’ पराक्रम करणारी पहिलीच भारतीय

---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वुमेन्स बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यात भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. बुधवारी (१७ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात मेलबर्न रेनेगड्स आणि सिडनी थंडर हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात मेलबर्न रेनेगड्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. असे असले तरा सिडनी थंडर संघातील फलंदाज स्म्रीती मंधांनाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

भारतीय फलंदाज स्म्रीती मंधांनाने मेलबर्न रेनेगड्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात लक्षवेधी खेळी आहे. तिने ६४ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि १४ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ११४ धावांची तुफानी खेळी केली. यासह वुमेन्स बिग बॅश लीग स्पर्धेत शतक झळकावणारी ती एकमेव भारतीय फलंदाज ठरली आहे.

तसेच स्म्रीती मंधांनाच्या नावे वुमेन्स बिग बॅश लीग स्पर्धेच्या इतिहासात आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तिने वुमेन्स बिग बॅश लीग स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याच्या बाबतीत ॲशले गार्डनरची बरोबरी केली आहे. परंतु, ही शतकी खेळी सिडनी थंडर संघाच्या कामी आली नाही. या सामन्यात सिडनी थंडर संघाचा ४ धावांनी पराभव झाला.

यासह सिडनी थंडर अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. शेवटच्या चेंडूवर सिडनी थंडर संघाला विजय मिळवण्यासाठी षटकार मारण्याची गरज होती. परंतु, स्म्रीती मंधांना असे करू शकली नाही.

या सामन्याबाबत बोलायचं झालं, तर सिडनी थंडर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न रेनेगड्स संघाकडून हरमनप्रीत कौरने नाबाद ८१ धावांची खेळी केली तर, एव्हलिन जोन्सने ४२ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर मेलबर्न रेनेगड्स वुमेन्स संघाला २० षटक अखेर ४ बाद १७५ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना, सिडनी थंडर संघाकडून स्म्रीती मंधांनाने सर्वाधिक ११४ धावांची खेळी केली. तर, तहीला विल्सनने नाबाद ३८ धावांची खेळी केली. परंतु सिडनी थंडर संघाला या सामन्यात ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या – 

येत्या जानेवारी महिन्यात रंगणार १९ वर्षाखालील विश्वचषकाचा थरार; जाणून घ्या स्पर्धेबदल सर्व काही

न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचीन रविंद्रच्या नावामागे ‘हे’ रहस्य; भारतीय क्रिकेटशी जोडलाय संबंध

भारताची एक नंबर जोडी! रोहित-राहुलने ५० धावांच्या भागीदारीसह ‘या’ विक्रमात मिळवला पहिला क्रमांक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---