सध्या महिला आशिया कप सुरुआहे. भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्म्रीती मानधनानं (Smriti Mandhana) आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तिनं भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कर्णधार हरमनप्रीत कौरला (HarmanPreet kaur) मागे टाकले. तर मानधना महिला आशिया कपमध्ये सर्वाधिक चौकार लगावणारी पहिली खेळाडू ठरली आहे.
यंदाच्या महिला आशिया कपमध्ये भारतानं पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यात स्म्रीती मानधनानं 31 चेंडूत 45 धावा केल्या. अर्धशतक लगावण्यापासून ती चुकली. तरीही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. मानधनाने 137 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3,365 धावा केल्या आहेत. तिनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला मागे सोडले.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडू
स्म्रीती मानधना- 3,365 धावा
हरमनप्रीत कौर- 3,349 धावा
मिताली राज- 2,364 धावा
महिला आशिया कपमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे टॉप 5 खेळाडू
48- स्मृती मानधना
41- हरमनप्रीत कौर
40- मिताली राज
30- जेमिमा रॉड्रिग्ज
30- बिस्माह महरुफ
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (HarmanPreet Kaur) 170 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिनं 27.90च्या सरासरीनं 3,349 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये कौरनं 11 अर्धशतकांसह 1 शतकही झळकावलं आहे. यादरम्यानं तिची सर्वाधिक धावसंख्या 103 राहिली आहे.
स्म्रीती मानधनानं (Smriti Mandhana) तिच्या आतापर्यंतच्या टी20 आंतराराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 137 सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिनं 3,365 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिची सरासरी 28.27 राहिली आहे. टी20 क्रिकेटमध्ये स्म्रीतीच्या नावावर 24 अर्धशतकं आहेत. तिनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 451 चौकारांसह 66 षटकार लगावले आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत मानधना तिसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2025 पूर्वी केएल राहुल परतणार RCBच्या ताफ्यात?
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ‘किंग’ कोहली रचणार इतिहास?
भारतीय संघाचे अच्छे दिन येणार? स्पेनच्या दिग्गज खेळाडूची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती