---Advertisement---

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मानधनानं मारली मुसंडी! श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाजाला टाकलं मागे

Smriti-Mandhana
---Advertisement---

भारताची स्टार महिला फलंदाज स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) तसंच उपकर्णधार आयसीसीच्या एकदिवसीय रँकिंगमध्ये एका स्थानानं वर आली आहे. मानधनाचं एकदिवसीय आयसीसी रँकिंगमध्ये 738 रेटिंग गुण आहेत आणि ती एकदिवसीय क्रिकेटच्या आयसीसी रँकिंगमध्ये टाॅप-3 फलंदाजांपैकी एक आहे.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये 9व्या स्थानावर कायम आहे. पण श्रीलंकेची दिग्गज फलंदाज चमारी अट्टापट्टू रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरली आहे.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या आयसीसी रँकिंगमध्ये इंग्लंडची नाट सिव्हर ब्रन्ट (Nat Sciver-Brunt) 783 रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची लौरा वल्वार्द्त (Laura Wolvaardt) 756 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारताची स्टार फलंदाज स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) 738 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. मानधनानं श्रीलंकेच्या दिग्गज चमारी अट्टापटूला मागे टाकत आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये मुसंडी मारली.

मानधनाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिनं भारतासाठी 85 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिनं 45.37च्या सरासरीनं 3,585 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 85.07 राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिनं 27 अर्धशतक आणि 7 अर्धशतक झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील तिची सर्वोच्च धावसंख्या 136 आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विनेश फोगटची नवी इनिंग! कुस्ती सोडल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार?
केवळ 3 टी20 सामने खेळलेल्या भारतीय फिरकीपटूला हवीय कसोटी संघात जागा, म्हणाला…
धक्कादायक! 2028च्या ऑलिम्पिक नंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्मिथ होणार निवृत्त?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---