---Advertisement---

स्मृतीची कमाल सुरुच! 40 धावांच्या नजाकती खेळीत रचला आणखी एक पराक्रम

---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार व अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना शानदार फॉर्ममध्ये आहे. मंधानाच्या बॅटमधून सातत्याने धावा होत आहेत. यादरम्यान ती अनेक विक्रमही आपल्या नावावर करतेय. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार खेळी केल्यानंतर स्मृतीने दुसऱ्या वनडेतही संघाला चांगली सुरुवात करून दिली. सोबतच एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.

कॅंटरबरी येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजी करताना स्मृतीने 40 धावा केल्या. या खेळी दरम्यान तीने वनडे क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या. वनडे क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करणारी मंधाना भारताची तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली. तिच्यापूर्वी मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी भारतासाठी 3000 धावा केल्या आहेत.
स्मृती मंधाना या ठिकाणी सर्वात वेगाने पोहोचणारी भारतीय फलंदाज ठरली. अवघ्या 76 डावात तीने ही कामगिरी केली. एवढेच नव्हेतर महिला क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 3000 धावा करणारी ती तिसरी फलंदाज ठरली. हा विक्रम ऑस्ट्रेलियाची महान फलंदाज बेलिंडा क्लार्कच्या नावावर आहेत. जिने अवघ्या 62 डावात हा पराक्रम केला होता.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातही सर्वात वेगाने हा टप्पा पार करणारी ती तिसरी फलंदाज आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनने 72 डावात तर, माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने 75 डावात हा टप्पा पार केला होता.

भारतीय डावाचा विचार केला गेल्यास, भारतीय संघाने नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण इंग्लंड संघाने दिले. शफाली वर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर स्मृती मंधाना व यास्तिका भाटिया यांनी 54 धावांची भागीदारी केली. दोघी अनुक्रमे 40 व 26 धावा काढून बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व हरलीन देओल यांनी डावाची सूत्रे हाती घेत 113 धावांची भागीदारी केली. हरलीनने शानदार अर्धशतक साजरे केले. ती 58 धावा करून बाद झाल्यानंतर पूजा वस्त्रकार व दीप्ती शर्मा यांनी हरमनप्रीतला सुयोग्य साथ देत भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यात योगदान दिले. निर्धारित 50 षटकात भारताने 5 बाद 333 धावा धावफलकावर लावल्या. इंग्लंडसाठी प्रत्येक गोलंदाजाने एक बळी मिळवला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
“रिषभला तुम्ही कसे बाहेर बसवू शकता?”; दिग्गजाचा संघ व्यवस्थापनाला सवाल
काय ही गोलंदाजी? एका वर्षात हर्षलची झालीये जोरदार धुलाई; वाचा संपूर्ण आकडेवारी 
पुन्हा बदलले गेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ठिकाण! लॉर्ड्स नव्हेतर या मैदानावर होणार सामना 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---