श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या त्रिकोणी महिला वनडे मालिकेच्या (Sri Lanka Womens Tri-Nation Series, 2025) श्रीलंकेविरुद्धच्या फायनल सामन्यात (INDw vs SLW Final) स्म्रिती मंधानाने (Smriti Mandhana) इतिहास रचला आहे. मंधानाने तिच्या वनडे कारकिर्दीतील 11 वे शतक पूर्ण केले आणि महिला वनडे सामन्याच्या फायनल सामन्यात शतक झळकावणारी दुसरी महिला फलंदाज ठरली. मंधानाच्या आधी हा पराक्रम करणारी मिताली राज (Mithali Raj) ही पहिली महिला होती. ‘क्रिकेटची क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंधानाने फक्त 92 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम केला.
याशिवाय, मंधाना ही भारताकडून महिला वनडे सामन्यात सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज आहे.
महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके-
15 – मेग लॅनिंग (102 डाव)
13 – सुझाना बेट्स (164 डाव)
11* – स्म्रिती मंधाना (102 डाव)
महिला वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार-
55* – स्म्रिती मंधाना
52 – हरमनप्रीत कौर
20 – रिचा घोष
CENTURY! 🙌
— BCCI Women (@BCCIWomen) May 11, 2025
11th ODI HUNDRED for vice-captain Smriti Mandhana 👏👏
Updates ▶️ https://t.co/rVyie6SUw9#TeamIndia | #WomensTriNationSeries2025 | #INDvSL | @mandhana_smriti pic.twitter.com/RSxCm0jSz2
श्रीलंकेविरूद्धच्या फायनल सामन्यात, मंधानाने 101 चेंडूत 116 धावांची खेळी केली, तिच्या डावात तिने 15 चौकारांसह 2 षटकार मारून पराक्रम केला. फायनल सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय महिला संघाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने 50 षटकांत 7 गडी गमावून 342 धावा केल्या. हरलीन देओल (47), कर्णधार हरमनप्रीत कौरने 41 धावा, जेमिमा रॉड्रिग्जने 47 धावा केल्या.