भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच सन २०२० -२०२१ साठीच्या महिला खेळाडूंसाठी करार यादी जाहीर केली. यात स्मृतीला ग्रेड-ए मध्ये ठेवण्यात आले होते. तिच्याबरोबर हरमनप्रीत कौर आणि पूनम यादव यांनाही या वर्गात स्थान देण्यात आले आहे. या ग्रेडमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना फी म्हणून २० ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी ५० लाख रुपये मिळतील.
भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौर्यावर जाईल. येथे संघ तीन वनडे, तीन टी२० आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. या दौर्यावर तीनही फॉर्मेटसाठी निवडलेल्या संघात स्मृतीला स्थान देण्यात आले असून, टी२० संघाची ती उपकर्णधार असेल.
महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना आजकाल याच दौर्याच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक जुना व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये स्मृती स्वतः रोलर चालवताना दिसत आहे. या व्हिडिओला, ‘मैदानावर सकाळचे काम, आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतेय.’ २४ वर्षीय स्मृतीने मागील महिन्यात इन्स्टाग्रामवर ४ दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण केले आहेत.
https://www.instagram.com/p/CPTAMCrhZwH/?utm_source=ig_web_copy_link
अशी राहिली आहे कारकीर्द
स्मृती भारतासाठी आत्तापर्यंत दोन कसोटी सामने, ५६ वनडे आणि ७८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. कसोटीत एका अर्धशतकाच्या मदतीने तीने एकूण ७१ धावा केल्या आहेत. वनडेत तिच्या नावे ४ शतके आणि १८ अर्धशतकांसह २१७२ धावा जमा असून, आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १७८२ धावा तिने पूर्ण केल्या आहेत. यात १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
यावर्षी जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये होणार्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत ती भाग घेईल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बीसीसीआयने तिच्यासह अन्य तीन खेळाडूंना एनओसीही दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना झाल्यावर या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटत होती, अक्षर पटेलने उलगडला अनुभव
दोन दिवसात दोन माजी क्रिकेटपटूंचे निधन, भारतीय क्रिकेट विश्वावर पसरली शोककळा
मी फक्त एकाच टी२० सामन्यात चांगली कामगिरी केली नाही