आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतेच २०२१ (ICC Awards 2021) वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले आहेत. चार दिवसांपूर्वी आयसीसीने आपले २०२१ वर्षातील कसोटी, वनडे व टी२० संघ जाहीर केले. त्यानंतर स़मवारी (२४ जानेवारी) वैयक्तिक पुरस्कारांची घोषणा देखील करण्यात आली. २०२१ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (ICC Women’s Cricketer Of The Year 2021) म्हणून भारताची सलामीवीर व मर्यादित षटकांच्या संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिची निवड करण्यात आले.
A year to remember 🤩
Smriti Mandhana's quality at the top of the order was on full display in 2021 🏏
More on her exploits 👉 https://t.co/QI8Blxf0O5 pic.twitter.com/3jRjuzIxiT
— ICC (@ICC) January 24, 2022
स्मृतीने गेल्या वर्षी खेळाच्या तिन्ही प्रकारांमध्ये चमकदार फलंदाजी केली. याच कारणाने आयसीसीने तिची रेचेल हेहो फ्लिंट ट्रॉफीसाठी निवड केली आहे. मंधानाची भारतातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते आणि तिने वर्षानुवर्षे केलेल्या कामगिरीने तिचे महत्त्व वाढले आहे. गेल्या वर्षी स्मृतीने एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. स्मृतीने अनेक सामन्यांमध्ये ३८.८६ च्या सरासरीने ८५५ धावा केल्या होत्या. यादरम्यान तीने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत.
स्मृतीने आपल्या लहानशा कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. २०१८ मध्ये तिने पहिल्यांदा आयसीसीची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून पुरस्कार मिळवला होता. त्याच वर्षी तिने सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कारही नावे केला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी स्मृती सांगली येथील रहिवासी आहे. तसे तिला भारताचे भविष्यातील कर्णधार म्हणून देखिल पाहिले जाते.
अशी राहिली आहे कारकीर्द
मंधानाने भारतासाठी चार कसोटी, ६२ एकदिवसीय आणि ८४ टी२० सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात तीने ४६.४२ च्या सरासरीने ३२५ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये तीने ४१.७० च्या सरासरीने २३७७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये तीच्या नावावर चार शतके आणि १९ अर्धशतके आहेत. टी२० मध्ये तीने २५९३ च्या सरासरीने १९७१ धावा केल्या आहेत. या खेळाच्या सर्वात लहान प्रकारात तीने चार अर्धशतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-