भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. भारतीय महिला संघ या मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाला जातानाचा एक व्हिडिओ संघाची सलामी फलंदाज स्म्रीती मंधानाने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. त्याव्यतिरिक्त जेमिमा रोड्रिग्जनेही हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून तो थोड्या वेळात प्रचंड व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलियाला जाताना भारतीय महिला संघातील खेळाडूंनी विमानात हा व्हिडिओ चित्रित केला आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी अंधाधुंध चित्रपटातील ‘अभी अभी प्यारा सा चेहरा दिखा है’ हे गाणे वापरले आहे. या गाण्यावर मंधाना, जेमिमा, युवा फलंदाज शेफाली वर्मा अभिनय करताना व्हिडिओत दिसत आहेत. मंधाना आणि जेमिमाने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मिड एअर रि-यूनियन.”
https://www.instagram.com/reel/CTOsiTSlQmi/?utm_source=ig_web_button_share_sheet
त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की, त्यांनी हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाला जाताना विमानातच तयार केलेला आहे. दरम्यान त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर ‘लिपस्टिक अंडर माय बर्खा’ चित्रपटातील नायिका अहाना कुमरा, काॅमेडियन राहुल सुब्रमण्यम, फुटबाॅलर करन अमीन आणि जसप्रीत बुमराहची पत्नी संजाना गणेशन यांनी त्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत
अहाना कुमराने व्हिडिओ पाहून खूप खुश झाली आणि तिने जेमिमा रोड्रिग्ज आणि मंधानाला खूपच क्यूट म्हटले आहे. तसेट काॅमेडियन राहुलने भारतीय महिला क्रिकेटर्ससाठी लिहिले आहे की, ‘काय पावरफुल संघ आहे’. करन अमीनने महिला क्रिकेटर्सच्या अभिनयाला अप्रतिम म्हटले आहे.
मंधाना आणि जेमिमाच्या पोस्टवर भारतीय महिला क्रिकेटपटू हरलीन देओलनेही कमेंट केली आहे. हरलिनने मंधानाच्या पोस्टवर लिहिले आहे की, “स्म्रीती मॅडम काय अप्रतिम पदार्पण आहे तुमचे.” जेमिमाच्या पोस्टवर हरलीनने लिहिले आहे, “हाहाहा खूपच प्रिय”