भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा टी20 सामना गुवाहाटी येथे सुरू झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी पुरता चुकीचा ठरवत 3 बाद 237 धावा उभारल्या. परंतु भारतीय डावाच्या आठव्या षटकात अशी काही घटना घडली, जी कदाचित क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडली असेल.
https://twitter.com/ISMAILBARRI85/status/1576598244024791040?t=smm6K6rCkZByWjVCdTlVYg&s=19
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला रोहित शर्मा व केएल राहुल यांनी वेगवान सुरुवात दिली. ते तुफानी फटकेबाजी करत संघाला 100 धावांकडे घेऊन चाललेले. मात्र, त्याचवेळी आठवे षटक सुरू होण्याआधी मैदानात चक्क सापाने प्रवेश केला. त्यामुळे खेळ काही कालावधीसाठी थांबवण्यात आला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/DurgeshPandeyIN/status/1576585429242900484?t=_59tgV7rrugC3BCT4yIfiQ&s=19
क्रिकेटचे मैदानावर विविध कारणामुळे खेळ थांबलेला पाहायला मिळतो. मैदानात पक्षी आल्याने, तसेच एखादा प्राणी आल्याने खेळ अनेकदा थांबतो. तसेच काही वेळा मैदानात वाहन देखील आल्याचे दिसले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!
पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…
तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे युवराज सिंग नाराज, पूजा वस्त्राकरला गमवावी लागली विकेट