लंका प्रीमियर लीग 2023चा 15 वा सामना बी-लव्ह कँडी आणि जाफना किंग्ज यांच्यात खेळला गेला. शनिवारी (12 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या या सामन्यात मोहम्मद हॅरीस याने कँडी संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले. पण लाईव्ह सामन्यात आलेल्या एक विना आमंत्रणाच्या पाहुण्याने मैफील लुटली. लंका प्रीमियर लीगच्या चालू हंगामात दुसऱ्यांदा सामना सुरू असताना स्टेडियममध्ये साप पाहायला मिळाला.
उभय संघांतील या सामन्यात बी-लव्ह कँडी संघाने 8 धावांनी विजय मिळवला. मोहम्मद हॅरीस (Mohammad Haris) याने 51 चेंडूत 81 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. यासाठी त्याला सामनावीर म्हणून सन्मानित देखील केले गेले. दुसरीकडे जाफना किंग्ज संघासाठी शोएब मलिक (Shoaib Malik) याने 37 चेंडूत 55* धावांचा ताबडतोड खेळी केली, मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दोन्ही संघ विजयासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसले. पण अखेर कँडीने जाफना किंग्जवर मात केली आणि सामना नावावर केला.
उभय संघांतील ही रोमांचक लढत सुरू असतानाच मैदानात साप पाहायला मिळाला. त्यावेळी जाफना किंग्ज संघ फलंदाजी करत होता. शोएब मलिक 41* आणि थिसारा परेरा 29* धावांसह खेळपट्टीवर होते. पण सीमारेषेबाहेर लावलेल्या बोल्ड्सच्या मागे साप दिसल्यामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबला देखील. दरम्यान, लंका प्रीमियर लीग 2023 मध्ये दुसऱ्यांदा साप दिसल्यामुळे जगभरात याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Snake is back in the LPL again. pic.twitter.com/0jo4F5s5KC
— CricketGully (@thecricketgully) August 12, 2023
याआधी हंगामातील दुसऱ्याच सामन्यात सापाने थेड आऊटफिल्डवर हजेरी लावली होती. 31 जुलै रोजी झालेल्या या सामन्यात गॅले टायटन्स आणि डंबुला आऊरा संघ आमने सामने होते. यावेळीही मैदानात साप आल्यामुळे चांगलीच चर्चा झाली होती. सोशल मीडियावर याविषयी वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही नेटकरी या सापाची तुलना खेळाडूंसोबत करताना दिसले. (Snake is back in Lanka Premier League 2023)
महत्वाच्या बातम्या –
सुप्रसिद्ध युट्यूबरला मागावी लागली पृथ्वी शॉची माफी! केलेली आक्षेपार्ह पोस्ट
‘तो कंफ्यूज दिसत होता…’, हार्दिकच्या नेतृत्वाबाबत भारतीय खेळाडूची मोठी प्रतिक्रिया