पुणे, 25 जुलै 2024: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडीने एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एसएनबीपी आंतरशालेय जिल्हा क्रीडा अजिंक्यपद 2023-24 हॉकी स्पर्धेत चार विजेतेपद पटकावून वर्चस्व गाजवले.
अंतिम फेरीत, एसएनबीपीने फैजान मिया आणि प्रणिल कपाडियाच्या गोलमुळे ज्योती स्कूलचा 2-0 असा पराभव करून 12 वर्षांखालील मुले गटाचे विजेतेपद मिळवले. दिया यादवच्या गोलमुळे त्यांनी 12 वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत एंजल स्कूलविरुद्ध बाजी मारली.
14 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत, वीरकुमार मेहता, आर्यन गायकवाड यांनी ग्रासरूट्स हॉकीविरुद्ध गोल केल्याने एसएनबीपीने जेतेपदावर नाव कोरले. मुलींच्या विजेतेपदात न्यू मिलेनियम स्कूलविरूद्ध गार्गी रासकर आणि दिप्ती कुमारीने केलेले गोल एसएनबीपी स्कूलसाठी निर्णायक ठरले.
निकाल :
12 वर्षांखालील मुले, अंतिम फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी ‘अ’: 2 (फैजान मिया, प्रणिल कपाडिया) विजयी वि. ज्योती स्कूल: 0
तिसरे-स्थान: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी ‘ब’: २ (श्रीशील यादव, झैन सय्यद) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली ‘अ’: १ (अनिकेत राठोर)
१४ वर्षांखालील मुले, अंतिम फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी ‘अ’: २ (वीरकुमार मेहता, आर्यन गायकवाड) विजयी वि. सेंट ज्युड हायस्कूल: ०
तिसरे स्थान: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी ‘क’: ३ (कुणाल साळुंखे २, अर्णव भोसले) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी ‘ड’: १ (अर्णव पाटील)
१२ वर्षांखालील मुले, अंतिम फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी ‘अ’: १ (दिया यादव) विजयी वि. एंजेल स्कूल: ०
तिसरे स्थान: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, एसएससी मोरवाडी: 1 (याहवी प्रब) विजयी वि. ग्रासरूट्स हॉकी: 0
१४ वर्षांखालील मुले, अंतिम फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी ‘अ’: २ (गार्गी रासकर, दिप्ती कुमारी) विजयी वि. न्यू मिलेनियम स्कूल: ०
तिसरे स्थान: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी ‘क’: 1 (ऋतुजा पाटील) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली ‘अ’: 0