---Advertisement---

मोठी बातमी! तिन्ही फॉरमॅट गाजवणारा पाकिस्तानी दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त! शेअर केली सविस्तर पोस्ट

On: रविवार, सप्टेंबर 3, 2023 6:17 PM
Sohail Khan Wahab Riaz
---Advertisement---

पाकिस्तान वेगवान गोलंदाज सोहेल खान याने रविवारी (3 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोहेलने पाकिस्तानसाठी कसोटी, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. असे असले तरी, मागच्या मोठ्या काळापासून तो संघातून बाहेर होता. अशातच त्याने निवृत्तीची घोषणा केली.

सोहेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली, तर 9 कसोटी, 13 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात अनुक्रमे 27, 19 आणि 5 विकेट्स त्याला मिळाल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने 121 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 516 विकेट्स घेतल्या आहेत. सोहेलने सध्या आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. येत्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांचे सामने आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सोहेलने निवृत्तीची घोषणा केली.

“आपल्या जवळच्या लोकांसोबत खूप चर्चा केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथण श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, माझे कुटुंब, प्रशिक्षक, मार्गदर्शन, संघातील सहकारी आणि चाहत्यांसह त्या सर्वांचे आभार, ज्यांना मला प्रत्साहन दिले. मी देशांतर्गत व्हाईट बॉल क्रिकेट आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळणे सुरू ठेवत आहे,” असे सोहेल केलेल्या पोस्टमध्ये सांगितले. (Sohail Khan decided to retire from International & First Class Cricket)

महत्वाच्या बातम्या – 
‘या’ 2 भारतीय धुरंधरांनी वर्ल्डकपमध्ये घेतलीय हॅट्रिक, कोण आहेत ते?
मूर्ती लहान पण कीर्ती महान! ईशानचा रौफच्या चेंडूवर जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---