नांदेड। नांदेड जिल्हा आणि शहर लॉन टेनिस संघटना यांच्या तर्फे आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात निशित रहाणे, अर्जुन गोहड, सोहम जाने या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नांदेड क्लब, सायन्स कॉलेज रोड येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पुरुष गटात एकेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या निशित रहाणे याने कोल्हापूरच्या काफिल कडवेकरचा 4-0, 4-1 असा तर, पुण्याच्या अर्जुन गोहड याने येवल्याच्या तन्मय नांदुर्डीकरचा 4-2, 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. नागपूरच्या सोहम जाने याने नाशिकच्या निनाद घुलेचा 4-0, 5-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सोलापूरच्या चंद्रकांत वाघमोडे याने नांदेडच्या हरजींदर सिंग चिरागियाचा 4-0, 4-0 असा एकतर्फी पराभव केला.
स्पर्धेचे उदघाटन नांदेड जिल्हा आणि शहर लॉन टेनिस संघटनेचे ट्रस्टी आणि सल्लागार डॉ. माधवराव किन्हाळकर आणि भगवानराव अलगावकर, नांदेड जिल्हा आणि शहर लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशोर विडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अली पंजवानी, निलेश चांडक, सतीश भेंडेकर, डॉ.नागप्पा निटुरे, डॉ.राज आंबुलगेकर, धनंजय डोईफोडे, नितीन आगळे आणि एमएसएलटीए सुपरवायझर प्रविण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: पुरुष गट: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
निशित रहाणे (पुणे)[1] वि.वि.काफिल कडवेकर (कोल्हापूर) 4-0, 4-1;
सोहम जाने (नागपूर) वि.वि.निनाद घुले (नाशिक) 4-0, 5-3;
अर्जुन गोहड (पुणे)वि.वि.तन्मय नांदुर्डीकर(येवला)4-2, 4-2;
चंद्रकांत वाघमोडे(सोलापूर) वि.वि.हरजींदर सिंग चिरागिया (नांदेड)4-0, 4-0.
महत्त्वाच्या बातम्या –
डॉ. शर्वरी इनामदार यांना राष्ट्रीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण