पुणे: पुणे महानगरपालिका आयोजित महाराष्ट्र राज्य शुटींग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने पुणे महापौर चषक राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धा २०१८ – १९, विश्रांतवाडी येथे २६ व २७ जानेवारी २०१९ या कालावधीत संपन्न झाली.
सदर स्पर्धेत ४४ पुरुष संघ आणि १० महिला संघांनी भाग घेतला होता. या मध्ये पुरुष गटातील झालेल्या फायनल मॅच मध्ये सोलापूर आणि टेंभुर्णी ह्या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना झाला.
या मध्ये सोलापूर संघाने विजय मिळवला तसेच तृतीय पारितोषिक खानापूर सांगली या संघाने मिळवले. पुरुष गटात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला अमीर काझी. महिला गटातील वर्धा आणि नगर जिल्हा अंतिम सामना वर्धा जिल्हा या संघाने विजय मिळवला व तृतीय क्रमांक नाशिक जिल्हा या संघाने मिळवले. महिला गटात मॅन ऑफ द मॅचची मानकरी ठरली वर्षा मोरया.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरसेवक अनिल दादा टिंगरे आणि नगरसेवक नाना सांगळे यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी वसंत शेजाळ,प्रवीण येरुंकर,संभा भोसले,निलेश माने,अनिल परदेशी,जयंत घोरपडे हे उपस्थित होते.