ससेक्ससाठी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकापासून ते पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीच्या लंकाशायरसाठीच्या शानदार स्पेलपर्यंत, चालू काउंटी चँपियनशीपमध्ये आतापर्यंत बरेच अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाले आहेत. यादरम्यान हॅम्पशायर विरुद्ध समरसेट संघात चालू असलेल्या डिवीजन वनच्या सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. समरसेटचा कर्णधार टॉम एम्बेल याने एका चेंडूवर आपली विकेट वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु शेवटी तो दुर्दैवीरित्या बाद झाला.
तर झाले असे की, समरसेट (Somerset) संघाने प्रथम फलंदाजी करताना २११ धावा केल्या. या डावादरम्यान हॅम्पशायरकडून (Hampshire) २५वे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास आला होता. त्याने षटकातील चौथा चेंडू ऑफ स्टंप्सच्या बरोबर बाहेर फेकला, ज्याला समरसेटचा कर्णधार टॉम एम्बेल (Tom Abell) बचावात्मक पद्धतीने हिट केले.
परंतु चेंडू हिट केल्यानंतर मैदानावर उसळी घेत उडाला. हे पाहून टॉम एम्बेलने चेंडूचा यष्टीशी संपर्क होऊ नये म्हणून भरपूर प्रयत्न केले. त्याने उसळी घेत असलेल्या चेंडूकडे पाहिले आणि त्याला पायाने मारत यष्टीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु भरपूर प्रयत्नांनंतरही चेंडू शेवटी यष्टीच्या एका बाजूला जाऊन (Tom Abell Wicket) धडकलाच. त्यामुळे टॉम एम्बेल चांगलाच वैतागला आणि पाय आपटत मैदानाबाहेर गेला. तसेच पव्हेलियनला परतताना त्याने मोठ्याने ओरडत आपली निराशा व्यक्त केली. टॉम एम्बेल २५ चेंडूत फक्त ६ धावा करून बाद झाला.
काउंटी चँपियनशीपने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘तुम्ही यावर विश्वास ठेवता का? टॉम एम्बेल फक्त चेंडूला पाहात आहे आणि चेंडू यष्टीकडे जात आहे.’ या नाट्यमय प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हॅम्पशायर आणि समरसेट सध्या डिवीजन वनच्या गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. सर्रे संघ ६ सामन्यांमध्ये (३ विजय, ३ अनिर्णीत) १०५ गुणांची कमाई करत अव्वलस्थानी विराजमान आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधारपद तर गेलंच पण नावावर असलेला खास रेकॉर्डही गेला; जड्डूचा ऑल टाईम रेकॉर्ड आता रियानच्या नावावर
आयपीएल २०२२मध्ये सीएसके कुठे कमी पडली? ‘हे’ एक कारण आहे जे कुणीच नाकारु शकत नाही
Video: मोईन अलीसमोर ट्रेंट बोल्टही हतबल, ओव्हरमधील सर्व ६ चेंडू केले सीमापार