आशिया कप शेवटचा 2023 मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा ही स्पर्धा ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर थेट प्रक्षेपित करण्यात आली होती. आता 2031 पर्यंत आशिया चषकाचे सर्व सामने दुसऱ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, आत्तापासून 2031 पर्यंत आशिया कपचे सर्व सामने ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वर पाहता येतील. अहवालानुसार, मागील स्पर्धेच्या तुलनेत यावेसच्या मीडिया हक्क करारामध्ये 70 टक्के वाढ झाली आहे. या करारा अंतर्गत केवळ आशिया चषकाचेच सामने नाही, तर 2031 पर्यंत आशियाई क्रिकेट परिषदेचे सर्व सामने सोनी नेटवर्कवर प्रसारित केले जातील. यामध्ये पुरुष आणि महिला आशिया चषक, पुरुष आणि महिला अंडर-19 आशिया चषक व पुरुष आणि महिला उदयोन्मुख संघ आशिया कपच्या सर्व आवृत्त्यांचा समावेश आहे. या कालावधीत चार पुरुष आशिया चषक स्पर्धा होणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, आशियाई क्रिकेट परिषद आणि सोनी नेटवर्क यांच्यात 170 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 1,433 कोटी रुपये) मध्ये हा करार झाला आहे. 2016 ते 2023 पर्यंतचे मागील मीडिया अधिकार 100 दशलक्ष डॉलर्समध्ये विकले गेले होते. अशा प्रकारे यावेळी 70 टक्के वाढ झाली आहे.
टीम इंडियाच्या नावावर सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा विक्रम आहे. मेन्स इन ब्लूनं आतापर्यंत एकूण आठ वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. आशिया कपची पहिली आवृत्ती 1984 मध्ये खेळली गेली होती, ज्यामध्ये टीम इंडिया जिंकली होती. तेव्हा सुनील गावस्कर भारताचे कर्णधार होते. या स्पर्धेचा शेवटचा हंगाम 2023 मध्ये झाला होता आणि त्यातही टीम इंडियानं बाजी मारली होती. तेव्हा रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता.
हेही वाचा –
भारतीय फलंदाज कसोटीत सातत्यानं फ्लॉप का होत आहेत? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू (टाॅप-5)
44 वर्षात असं केवळ दुसऱ्यांदा घडलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या नावे लाजिरवाणा विक्रम