भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने रशियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने अंतिम सामन्यात जपानच्या कोकी वातानाबेला पराभूत करत हे विजेतेपद मिळवले.
25 वर्षीय सौरभने वातानाबेला एक तास चाललेल्या या अंतिम सामन्यात 19-21, 21-12, 21-17 अशा फरकाने पराभूत केले.
या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये वातानाबेने मध्यंतरापर्यंत 11-5 अशी आघाडी घेतली होती. परंतू त्यानंतर सौरभने ही आघाडी 11-12 अशी कमी केली. पण अखेर वातानाबेने या सेटमध्ये 21-18 असा विजय मिळवत सामन्यात आघाडी घेतली.
सौरभनेही हार न मानता दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन करत 11-6 अशी आघाडी मिळवली. त्यानंतरही त्याने आक्रमक खेळ चालू ठेवत हा सेट 21-12 असा सहज जिंकला आणि सामना बरोबरीचा केला. त्यामुळे हा सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला.
तिसऱ्या सेटमध्येही सुरवातीला वातानाबेने 9-3 अशी आघाडी घेतली होती. मात्र नंतर सौरभने त्याला कडवी लढत देत हा सेट 17-17 असा बरोबरीचा केला आणि यानंतर 4 पॉइंट्स मिळवत हा सेट 21-17 असा जिंकून सामन्यातही विजय मिळवला.
मागील काही महिन्यांपासून सौरभ दुखापतग्रस्त असल्याने तो खेळू शकला नव्हता. मात्र त्याने आता दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन केले आहे.
या विजेतेपदानंतर सौरभ म्हणाला अजूनही मी माझा खेळ सुधारण्याचा प्रयत्न करत असून माझे पुढचे लक्ष एशियन गेम्सवर असणार आहे.
मिश्र दुहेरीत भारतीय जोडीला उपविजेतेपद:
रशियन ओपनमध्ये भारताच्या रोहन कपूर आणि कुहू गर्ग या मिश्र दुहेरीच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
त्यांना रशियाचा व्लादिमिर इवानोव आणि कोरियाची किम मिन क्यूंग या जोडीने अंतिम सामन्यात 21-19,21-17 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–मेसट ओझीलला पाठींबा देण्यासाठी ट्विटरवर चाहत्यांनी सुरू केली चळवळ
–कुलदीप नकोच, अश्विनच बेस्ट; ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत
–नाणेफेक झाली चक्क क्रेडिट कार्डने!