---Advertisement---

‘…म्हणून विराटच्या पालकत्त्व रजेच्या विषयावर अधिक चर्चा नको’, गांगुलीचे मोठे वक्तव्य

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 7:39 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेडमध्ये खेळला जात आहे. या सामन्यानंतर विराट मायदेशात परतणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयनेही या दौऱ्याची सुरुवात होण्यापूर्वीच विराटच्या पालकत्त्व रजेस मान्यता दिली होती. त्यानंतर आता नुकतेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने विराटच्या पालकत्त्व रजेविषयी मोठे वक्तव्य केले आहे.

गुरुवारी एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना गांगुली म्हणाला की, “विराटला जे योग्य वाटले ते त्याने केले. बीसीसीआयने विराटच्या विनंतीस मान देत त्याला भारतात परतण्याची परावानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाविषयी अधिक चर्चा करण्याची गरज नाही. पालकत्त्व रजा घेऊन कसोटी मालिका संपण्यापुर्वी मायदेशात परतण्याचा निर्णय विराटचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावर लोकांचे वेगवेगळे मत असू शकते.”

यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने विराटच्या या निर्णयास समर्थन दिले होते. “विराटने जो निर्णय घेतला आहे, त्याचा सर्वांनी सन्मान करायला हवा. प्रत्येक क्रिकेटपटूचे आपापले वैयक्तिक आयुष्य आहे. जर त्याला आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी आपल्या पत्नीजवळ उपस्थित राहायचे असेल, तर हा खूप चांगला विचार आहे,” असे स्मिथने म्हटले होते.

पहिल्या कसोटी सामन्यात विराटची अर्धशतकी खेळी
ऍडलेड येथे चालू असलेल्या दिवस- रात्र कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने २०० धावांचा आकडा ओलांडला. यात विराटच्या सर्वाधिक ७४ धावांचा समावेश आहे. त्याने ८ चौकारांच्या मदतीने ही धावसंख्या गाठली. परंतु शेवटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे तो धावबाद झाला. इतर कोणत्याही भारतीय फलंदाजांना किमान ५० धावाही करता आल्या नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या-

रिकी पाँटिंगने पृथ्वी शॉबद्दल केलेली ‘ही’ भविष्यवाणी ठरली खरी

…अन विराट बाद असूनही राहिला नाबाद; वाचा काय आहे प्रकरण

कर्णधार असावा तर असा! अंगठ्यातून रक्त येत असतानाही दाखवली विराटने ‘हिम्मत’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---