---Advertisement---

वाढदिवसाच्या दिवशी पाहायला मिळाला सौरव गांगुलीचा ‘हटके अंदाज!’, डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

On: शनिवार, जुलै 9, 2022 9:16 AM
Sourav-Ganguly-Dancing
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज ८ जुलै रोजी आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटला घडवण्यात गांगुलीची महत्त्वाची भूमिका आहे. गांगुलीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली ज्यांनी भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले.

क्रिकेट जगतात ‘दादा’ म्हणून ओळखला जाणारा गांगुली सध्या लंडनमध्ये आहे. तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याच्यासोबत पत्नी डोना आणि मुलगी सना आहे. सोशल मीडियावर सध्या गांगुली एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये गांगुली त्याची मुलगी आणि काही जवळच्या मित्रांसोबत डान्स करत आहे. गांगुली ‘लंडन ठुमकडा’ आणि ‘दीवांगी-दिवांगी-दिवांगी है’वर नाचतोय.

सौरव गांगुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक दिग्गजांनी त्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गांगुलीने केलेल्या बर्थडे सेलिब्रेशनचा भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या कुटुंबासोबत अतिशय चांगला वेळ गालवत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय कामाचा ताण बाजूला सारत गांगुलीही एकदम जोशात गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सध्या इंग्लंडमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत असला तरीही त्याला त्याच्या जबाबदारीचा विसर पडलेला नाही. त्याने भारत विरुद्ध इंग्लंडच्या पाचव्या कोसटी सामन्याला हजेरी लावली होती. सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध इग्लंड टी२० आणि एकदिवसीय मालिकेतील उर्वरित सामने पाहण्यासाठीही गांगुली मौदानावर हजेरी लावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी मालिका विजयाची संधी! पण ‘या’ अडचणी पार कराव्या लागणार

INDvENG। ५ महिन्यांनंतर टी२०मध्ये पुनरागमन करणाऱ्या विराटला संघात स्थान मिळणार का?

तब्बल १८ वर्षापूर्वी दिनेश कार्तिकने घेतलेल्या झेलचा ‘तो’ खेळाडू घेणार बदला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---