भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष (BCCI) आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मंगळवारी (24 डिसेंबर) फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनची (R Ashwin) प्रशंसा केली आहे.
आयसीसीने नुकतेच सोशल मीडियावर 2010 ते 2019 या दशकातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजांच्या यादीची एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये आर अश्विन अव्वल स्थानी आहे. अश्विनने या दशकात एकूण 227 सामन्यांत 27.15 च्या सरासरीने 564 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतले आहेत. त्यामध्ये त्याची 7/59 ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
त्यामुळे गांगुलीने आयसीसीच्या या पोस्टचा स्क्रीनशाॅट ट्विटरवर शेअर करत अश्विनचे कौतुक केले.
“अश्विनच्या नावावर या दशकातील (Decade) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. उत्कृष्ट कामगिरी आहे. एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे काही वेळा काही गोष्टी लक्षात येत नाही. मस्त,” असे गांगुलीने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले.
Most international wickets for ashwin this decade @ashwinravi99 @bcci .. what an effort .. just get a Feeling it goes unnoticed at times .. super stuff .. pic.twitter.com/TYBCHnr0Ow
— Sourav Ganguly (@SGanguly99) December 24, 2019
2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अश्विनची गणना दिग्गज गोलंदाजांमध्ये केली जाते. अश्विन सध्या भारताच्या वनडे आणि टी20 संघातून बाहेर आहे. परंतु, तो कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
अश्विनने 2017मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. तसेच, काही दिवसांपूर्वी त्याने रणजी ट्राॅफीमध्येही चांगली कामगिरी केली होती.
अश्विनने आतापर्यंत 70 कसोटी, 111 वनडे आणि 46 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने अनुक्रमे 362, 150 आणि 52 विकेट्स घेतले आहेत.
या दशकातील सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
564 विकेट्स- आर अश्विन- 227 सामने
538 विकेट्स- जेम्स अँडरसन- 180 सामने
531 विकेट्स- स्टुअर्ट ब्राॅड- 213 सामने
472 विकेट्स- टीम साऊदी- 237 सामने
458 विकेट्स- ट्रेंट बोल्ट- 180 सामने
452 विकेट्स- डेल स्टेन- 180 सामने
450 विकेट्स- रंगना हेरथ- 154 सामने
449 विकेट्स- मिचेल स्टार्क- 168 सामने
439 विकेट्स- माॅर्ने माॅर्कल- 197 सामने
418 विकेट्स- शाकिब अल हसन- 238 सामने
२०१९ या वर्षातील फक्त 'ती' गोष्ट बदण्याची विराट कोहलीला इच्छा
वाचा- 👉https://t.co/eUChoX7GYU👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019
माझ्यासाठी ही नवी सुरुवात असली तरी फलंदाजी करणे विसरलेलो नाही-शिखर धवन
वाचा- 👉https://t.co/WVdxdjQxpl👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019