---Advertisement---

अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणीबाबत डॉक्टरांकडून मोठी माहिती

On: रविवार, जानेवारी 3, 2021 10:05 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी (२ जानेवारी) हृद्यविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याला त्वरित रुग्णालयात भरती करण्यात आले आणि तिथे त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे. अशात गांगुलीच्या कोरोना चाचणीविषयी मोठी माहिती पुढे येत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार गांगुलीला शनिवारी(२ जानेवारी) सकाळी त्याच्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला लगेचच कोलकातामधील वूडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याची अँजिओप्लास्टी करण्यापुर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयाचील डॉक्टरांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

सौरव गांगुलीच्या प्रकृतीविषयी अपडेट

याबरोबरच डॉक्टरांनी गांगुलीच्या तब्येतीबाबत अपडेट दिले आहेत. गांगुलीची पहिली अँजियोप्लास्टी यशस्वीरित्या पार पडली असून यावेळी त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला आहे. तसेच, गांगुलीच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असून एका रक्तवाहिनीत ९० टक्के ब्लॉकेज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सध्या सर्जरीनंतर गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवसांत त्याच्या हृदयात आणखी दोन स्टेंट टाकले जाऊ शकतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द

बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने १९९२ ते २००८ या कालावधीत भारताकडून क्रिकेट खेळले आहे. दरम्यान त्याने ३११ वनडे सामने खेळले असून ११३६३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११३ सामने खेळले असून ७२१२ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने एक द्विशतक आणि १६ शतके लगावली आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून निवड झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग! सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

अनेक राजकीय नेत्यांनी केली विचारपूस, चाहत्यांकडून प्रार्थना; सौरव गांगुलीच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट!

जेव्हा चेतन शर्माने घेतली होती हॅट्रिक; तेही तीन क्लीन बोल्ड!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---