भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना काही दिवसापूर्वी छातीत दुखू लागल्याने अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचबरोबर चिंता करण्याचे काहीही कारण नाही. त्यांना आज (बुधवारी) हॉस्पिटल मधून घरी सोडले जाणार होते. मात्र सौरव गांगुली यांना आजच्या दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचे आहे.
यापूर्वी वुडलँड्स हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते की, त्यांना आज (बुधवारी) घरी सोडण्यात येणार होते. मात्र गांगुली यांची इच्छा आहे की, आजचा दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे म्हणून त्यांना घरी सोडण्यात आले नाही.
काही दिवसांपूर्वी सौरव गांगुली नेहमी प्रमाणे व्यायाम करत असताना, त्यांच्या छातीत अचानक वेदना होवू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या आरोग्यासाठी सर्व लोकांनी प्रार्थना केली होती. पण आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
घरामधे लक्ष ठेवणार डॉक्टर
वुडलँड्स हॉस्पिटलच्या सीईओ रुपाली बासु म्हणाल्या, “सौरव गांगुली यांना हॉस्पिटल मधून सुट्टी दिल्यानंतर, नियमितपणे त्यांच्या घरी त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल.” सौरव गांगुली यांना मागील आठवड्यात हलकासा हृदयाचा झटका आला होता. ज्यानंतर त्यांची एंजिओप्लास्टी करण्यात आली होती. शनिवारी गांगुली यांच्या रिपोर्ट मध्ये हृदयाच्या संबंधित ट्रिपल वेसेल डिसीजची माहिती मिळाली. त्यांच्या हृदयाच्या तीन रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होते. त्यामुळे सौरव गांगुली यांची दुसर्यांदा एंजिओप्लास्टी केली जाऊ शकते.
पूर्णपणे फिट आहेत सौरव गांगुली
नामांकित हृदयरोग विशेषज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांनी सौरव गांगुली यांची तपासणी केल्यानंतर म्हणाल्या की, हृदयाच्या झटकण्याने त्यांच्या आरोग्याला कोणते ही नुकसान झाले नाही.”डॉक्टर शेट्टीने वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये गांगुली यांच्यावर उपचार करणार्या 13 डॉक्टरांच्या पथकाशी चर्चा केल्यानंतर म्हणाल्या,” गांगुली लवकरच व्यवस्थित होतील. कारण त्यांचे हृदय त्याप्रमाणे काम करत आहे, ज्याप्रमाणे 20 वर्षाच्या व्यक्तीचे करते. ”
डॉक्टर शेट्टी म्हणाल्या, “हा कोणता हृदयाचा मोठा झटका नव्हता. यामुळे त्यांच्या आरोग्याला कोणतेही हानी झाली नाही. याचा भविष्यात त्यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ते सामान्य जीवन जगू शकतात. गांगुली निसंकोच मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेवू शकतात. विमान उडवू शकतात. त्याचबरोबर आपले प्रत्येक स्वप्न आणि इच्छा पूर्ण करू शकतात. जर त्यांना वाटत असेल तर क्रिकेट सुद्धा खेळू शकतात. त्याचबरोबर ते सामान्य व्यक्तिप्रमाणे व्यायाम करू शकतात. ”
डॉ. शेट्टी यांना विचारण्यात आले की पुन्हा एंजिओप्लास्टी करावी लागेल का? त्यावर डॉ. शेट्टी म्हणाल्या,” त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत. ते औषधे घेवून सुद्धा उपचार करू शकतात. मात्र चांगले हे राहील की, त्यांनी एंजिओप्लास्टी करून घ्यावी. हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आम्हाला वाटते त्यांनी दोन आठवडे प्रतिक्षा करावी आणि त्यानंतर निर्णय घ्यावा.”
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
वाढदिवस विशेष: कपिल देव आणि ४ चेंडूत ४ षटकार…
‘त्याला कोणती शाळाही प्रशिक्षक म्हणून घेईल, असं मला वाटत नाही’