माजी कर्णधार सौरव गांगुलीने एमएस धोनीच्या कालच्या वनडे सामन्यातील कामगिरीचे जोरदार कौतुक केले आहे. धोनी संघात असल्यामुळे त्याचा भारतीय संघाला कसा फायदा होतो याबद्दल गांगुलीने सांगितले आहे.
काल संघ ७ बाद २९ असा अडचणीत असताना धोनी संघाच्या मदतीला धावून आला आणि सर्वबाद ११२ धावा अशा स्थितीत नेवून ठेवले.
याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, ” ही धोनीने केलेली एक खास खेळी होती. तो जेव्हा संघाला गरज असते तेव्हा खेळतो आणि एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवतो. म्हणूनच विराटला तो संघात हवा असतो.”
अजिंक्य राहणेबद्दल बोलताना गांगुलीने तो वनडे संघात हवाच असेही म्हटले आहे.
भारत दुसरा वनडे सामना १३ डिसेंबर रोजी मोहाली येथे खेळणार आहे.