---Advertisement---

गांगुलीची ‘दादा’गिरी पुन्हा होणार सुरू! महत्वाच्या सामन्यासाठी टीम इंडिया जाहीर

On: शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022 1:54 PM
Sourav Ganguly
---Advertisement---

लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि लीजेंड्स लीग क्रिकेटचे आयुक्त रवी शास्त्रींनी याबाबत मोठे विधान केले आहे. हा हंगाम भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिवसाला समर्पित केला जाणार आहे, असे मत त्यांनी मांडले आहे. या लीगला सप्टेंबर महिन्यात सुरूवात होणार आहे. यातील पहिला सामना इंडिया महाराजा विरुद्ध रेस्ट ऑफ दी वर्ल्ड यांच्यात खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. 

सौरव गांगुली (Sourav Ganguly) कर्णधार असलेल्या इंडिया महाराजा संघात १७ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विरेंद्र सेहवाग, युसूफ पठाण, मोहम्मद कैफ, सुब्रमण्यम बद्रीनाथ यांचा समावेश आहे. इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी आणि एस श्रीसंथ यांचीही निवड करण्यात आली आहे. तसेच हरभजन सिंग,अशोक डिंडा, प्रज्ञान ओझा, आरपी सिंग आणि जोगिंदर शर्मा हे पण  संघात उपस्थित आहेत.

या सामन्यातील रेस्ट ऑफ दी वर्ल्ड संघाचे नेतृत्व ओएन मॉर्गन करणार आहे. इंडिया महाराजा विरुद्ध रेस्ट ऑफ दी वर्ल्ड हा विशेष सामना आहे. हा सामना १६ सप्टेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. तर या सामन्यात १० विदेशी खेळाडू भाग घेणार आहेत.

ही लीग या सामन्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे १७ सप्टेंबरला सुरू होणार आहे. ज्यामध्ये ४ संघ या लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये फ्रॅंचायजीच्या स्वरूपात असणार आहेत. या हंगामात एकूण १५ सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांतील खेळाडूंची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.

या लीगचा मागील हंगाम ओमान येथे आयोजित करण्यात आला होता. यंदा तो भारतात खेळवला जाणार असल्याने भारतीय चाहत्यांसाठी एकप्रकारे हे उत्तमच झाले आहे.

इंडिया महाराजा संघ 

सौरव गांगुली (कर्णधार), विरेंद्र सेहवाग, युसूफ पठान, मोहम्मद कैफ, सुब्रमण्यम बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंग, जोगिंदर शर्मा, रीतिंदर सिंग सोढ़ी.

रेस्ट ऑफ़ द वर्ल्ड संघ

ओएन मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्युलम, जाॅन्टी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकाद्जा, मश्रफे मोर्तजा, असगर अफगान, मिशेल जॉनसन, ब्रेट ली, केविन ओ’ब्रायन, दिनेश रामदीन

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

तुर्तास संकट टळलं! बाबर आझमसह अन्य खेळाडूंनी केली पीसीबीच्या वार्षिक करारावर स्वाक्षरी

पाकिस्तानी खेळाडू यावर्षी भारतात क्रिकेट खेळणार? स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणार विशेष सामना

पत्रकाराने निवृत्तीवरून विचारला प्रश्न; चिडलेला बाबर आझम म्हणाला, ‘मी म्हातारा वाटतोय..’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---